Posts

Image
  सागरी मत्स्य संपत्तिची वामन कथा - भाग १    भारतीय संस्कृतीत प्रसिद्ध असलेली दशावतार संकल्पना आणि कथा माहीत नसेल असे व्यक्तिमत्व कोणी अभावानेच असेल. या दशावतारात एक अवतार फार लोभस आहे पण जेव्हा ते आपली परिसीमा गाठते तेव्हा त्याची व्याप्ती मात्र अमर्याद होत जाते. वामन अवतार म्हणजे वरकरणी पाहता एक छोटं बालक रूप पण जेव्हा हाच वामन रूप धारी भगवंत बळी राजाकडे तीन पाऊले जमीन मागतो तेव्हा सुरवातीला नाजूक आणि इवलेसे भासणारी पाऊले तिन्ही लोक व्यापतात.      पाचवे अवतार  बळीच्या द्वाराला जासी         भिक्षे स्थळ मागुनी बळीला पाताळी नेसी       आरती गाताना आपण हे पद नेहमी गातो परंतु या अवताराची तशी सर्वसामान्य जनमानसात प्रसिद्धी नाही. असो या लेखाच्या माध्यमांतून मत्सव्यवस्थापन आणि नियोजन शाखेतील एक व्यापक शास्त्रीय गोष्ट आपणांस समजावून सांगताना या वामन रुपाची कृतज्ञता पूर्वक आठवण करणे इथे खूप उपयुक्त आहे.    ज्याप्रमाणे सुरवातीला खूप लहान भासणारी तीन वामन पाऊले...
Image
नाविण्यपूर्णतेचा ध्यास ‘ चिरंतन महासागर ‘ जपण्यासाठी   विकासाच्या वाटेवर चालत असताना मानवी समाज नेहमी खूप मोठ्या जलस्त्रोता काठी स्थिरवलेला दिसून येतो. मग कधी ही मानवी सभ्यता मोठ्या नदी किनारी विकसित होते तर कधी मोठी शहरे ही समुद्र किनारी विस्तारलेली दिसतात. ठिकाण नदी असो ओढा असो की खाडी वा समुद्र किनारा ‘पाणी’ ही अतिशय महत्वपूर्ण गोष्ट आहे ज्या भोवती आपले वाड-वडील, आपण आणि आपली येणारी पिढी वास्तव्य करणार आहे. मानवी शरीर असो की इतर कोणी सजीव पेशी साधारण ६०-८०% ही पाण्याने व्याप्त असते; प्रमाणात पेशी आणि प्रजाती प्रकारानुसार फरक दिसून येतो परंतु ‘पाणी’ हा घटक खूपच महत्वपूर्ण हे काही कोणाला नाकारता येणार नाही.   शाळेत प्रवेश केल्यावर तिसरी किंवा चौथी ला  आपण एक महत्वपूर्ण गोष्ट विज्ञान आणि भूगोलाचा अभ्यास करताना शिकतो ती म्हणजे ‘जलचक्र’ अर्थात जमिनीवर असलेल्या पाण्याची उष्णतेने वाफ होते ही वाफ थंड झाली की त्याचे ढग बनवतात, ढग थंड होऊन जेव्हा जड होतात तेव्हा पाऊस पडतो. शाळेत शिकत असताना आपण एक इयत्ता पास होतो आणि पुढच्या वर्गात सरकत असतो. जलचक्र...
Image
परशुरामाची भूमी आणि कासव संवर्धनाची विकास गाथा    हि गोष्ट तेव्हा सुरु होते जेव्हा मी सप्टेंबर २०१९ मध्ये माझ्या दोन वर्षाच्या संशोधन भूमिकेतून बाहेर पडलो होतो आणि घरी असलेल्या पारंपारिक मासेमारी   व्यवसायाकडे वळायचं ठरवलं. पण म्हणतात ना कि काही गोष्टी या आपल्या साठी जणू परमेश्वरी योजना म्हणून आखून ठेवल्या असतात आणि ते आपल्या सोबत घडायला लागतं आपल्या कल्पनेपलीकडे. काही दिवस मुंबई च्या समुद्री किनारी मासेमारी आणि भटकंती करून झाले होते आणि एक दिवशी एक ईमेल  माझ्या मेल बॉक्स मध्ये पडतो. काय आपल्या समुद्री कासव संशोधनात सहभागी व्हायची इच्छा आहे? काय आपण यासाठी काम करू इच्छित आहात?  वेळ न दवडता माझ्या मनाने उत्तर दिलं हो, मला यांसाठी जायला हवं. या संशोधनाचं केंद्र होत परशुरामाची भूमी 'कोकण' चा सागरी किनारा.  मी याला माझा होकार दर्शक ईमेल पाठवलं आणि काही दिवसात माझी या संशोधन गटात निवड झाली.    दि ३१/१०/२०१९ ला रात्री च्या वेळी लाल परीने माझा प्रवास मुंबई सेंट्रल स्थानकातून सुरु झाला. मुंबई-दापोली- हर्णे- पाजपंढरी-आंजर्ल...
Image
https://youtu.be/DSJCRfsHlws आणि अचानक कधी ओलावा अंतरीचा शाल त्याला स्मितहास्याची   कधी उदास बेभान वारा जाणीव त्याला बोचऱ्या एकटेपणाची    II१II कधी पवित्र, पुण्य आणि पावन जशी भूपाळी वासुदेवाची कधी सुरेल पण कारुण्य आणि उद्ववगणीत सिद्धार्थ गौतमाची    II२II केव्हातरी अचानक अलगद आता मला भास होतात   जागेपणातही आता स्वप्नाच्या गावी जातात    II३II जिंकायची वा हरण्याची आशा कधी मणी न होती   खेळण्याची प्रवृत्ती मात्र अविरत श्वासात होती   II४II काही गोष्टी सुरु होतात शेवट करून घेण्यासाठी   कधीतरी मात्र शेवट ठरतो गोड सुरवात करण्यासाठी   II५II मी काही आता अजून पुरा संपलो नाही   गाण्यासाठी मात्र हे गीत आता स्वतःचाही  उरलो नाही   II६II कवी :- प्रदिप नामदेव चोगले             pradipnc93@gmail.com ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------...
Image
चक्रम  वर्ष संपल, वर्ष चालू झालं   जाणीव झाली परीक्षा पुन्हा आली रात्री नंतर दिवस येतो   दिवसांतर रात्र येते    II १ II दिन रात्रीच्या चक्रात आयुष्याची   पुन्हा एक पहाट होते माणूस म्हणून जगण्यासाठी   सैताना बरोबर हार होते  II२II  करामध्ये जोर नाही आणि   उरामध्ये धीर नाही आयुष्याच्या या नव्या खेळीमध्ये   ना नवा उत्साह, ना नवा श्वास नाही  II३II  पैलतीरि उभा हा पाडुरंग   त्याला आता वारकऱ्याची साथ नाही आजकाल तर सारे नवरात्रीत असतात   आयुष्याच्या पेटलेल्या वणव्यात असतात  II४II  कसं आहे म्हटल्यावर बरं असं उत्तर आहे   खरं नाही परंतु बोलण्याची ही तऱ्हा आहे माणूस म्हणून जगणे म्हणजे आता ब्रँडवॉर आहे    आयुष्यात आता पैरो के लिए पेरॉगोन आहे  II५II  आहे-आहे आणि नाही-नाही  या कवितेचा हा फॉर्म आहे  आयुष्य या पेक्षा काही वेगळं नाही    आता सारे आहे आणि उद्या काही नाही आहे  करून घे मित्रा उल्हास आणि आनंद...
Image
बुद्ध पौर्णिमा आणि मी    आजचा दिवस खूप खास आहे माझ्यासाठी कारण हाच तो दिवस आहे ज्या दिवशी माझ्या जीवनाला कलाटणी घडणाऱ्या घटना भगवान बुद्ध यांच्या प्रेरणेने घडल्या. या जगात कुठल्याच महापुरुषाच्या जीवनात इतका अद्भुत योगायोग नाही घडला असेल. याची विशेषता म्हणजे याच दिवशी भगवान बुद्ध याचा जन्म झाला याच दिवशी त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि याच दिवशी त्यांनी महापरिनिर्वाण स्वीकारलं. खरंतर माझी इतकी योग्यता नाही कि मी या प्रचंड चुंबकीय व्यक्तिमत्वाबद्दल काही लिहलं वा बोललं पाहिजे परंतु कृतज्ञता बुद्धीने मी हे करत आहे. आज माझ्या जीवनाला जो आकार प्राप्त झाला आहे त्याला मोठ्या प्रमाणात बुद्ध चरित्राचं वाचन कारणीभूत आहे. योग्य पुस्तक योग्य वेळी जर आपल्या हाती पडलं तर जीवनाची दिशा बदलू शकते याचा प्रत्यय मी स्वतः घेतला आहे.    हि गोष्ट आहे साल १९९८ ची जेव्हा मी इयत्ता ३ री मध्ये शिकत होतो. माझ्या शाळेचं नाव कुलाबा महानगर पालिका मराठी शाळा क्रमांक ३. निमित्त होत बुद्ध पौर्णिमे च्या निमित्ताने शाळेत वक्तृत्व स्पर्धा आणि मी त्यात भाग घेतला होता विषय होता 'माझी शाळ...
Image
प्राण्यांची  भाषा    आपल्या अवती भवती कित्येक असे प्राणी, पक्षी तसेच कीटक आहेत ज्यांना आपण नेहमी पाहतो. त्याचा वावर हा आपल्यासाठी काही खास कुतूहलाचा विषय नसतो, परंतु विज्ञानाच्या जगतात प्राण्याची वर्तणूक हि विशेष अशी अभ्यासाची शाखा आहे. आज आपण असे कित्येक गोष्टी प्रगत यांत्रिक गोष्टीचा वापर करत असतो ज्या या प्राण्यांकडून आपण शिकलो आहोत. मग ते मोठे पूल बांधणे असो कि महाकाय असे विमान असोत. माणूस निसर्गात घडणाऱ्या विविध गोष्टीच्या अभ्यासातून खूप काही शिकला आहे.    वर मी लिहिलेली कवीता म्हणजे माझ्या अभ्यासात असलेलं काही प्राणी जगताच्या वर्तणूक शास्त्राच्या संशोधनातील प्रश्न आणि वैज्ञानिकांना सापडलेली उत्तरे होत. गेल्या दोन वर्षात ठाणे खाडीत काम करत असताना मी कित्येक लाखो रोहित पक्षी पहिले त्याचा विणीचा हंगाम म्हणजे पक्षी निरीक्षणांची पर्वणी. तसेच गेल्या सहा महिन्यापासून कोकणात येणाऱ्या असंख्य समुद्री कासवे हा अभ्यासाचा आणि निरीक्षणाचा विषय आहे. या सर्व गोष्टी करत असताना मी जे पहिले आणि वाचले त्या गोष्टीना मी या कवितेतून आपल्या समोर आणलं आहे.  ...