Posts

माझ्या कविता - निरागस कुतूहल

Image
प्रस्तावना : - मागील दोन वर्षांपासून भारतीय समुद्री क्षेत्रात सागरी सस्तन प्राणी आणि समुद्री कासवे यांच्या संशोधन मोहिमेमध्ये सहभागी होणे ही माझ्या साठी एक खूप मोठी उपलब्धी आहे. बालपणापासून समुद्र आणि मासेमारी हे तर रोजच्या जीवनाचा भाग आहे परंतु शास्त्रीय पद्धतीने सागर संशोधन करणाऱ्या चमू चा एक अविभाज्य भाग बनणे म्हणजे जे स्वप्न उराशी बाळगून आहे त्या दिशेने आगेचूक करण्यासारखे आहे. मित्रहो सदर कविता म्हणजे माझ्या मनांत बुद्धी आणि भावना याचा चाललेल्या नाटकाचा एक विनोदी प्रयोग आहे.   निसर्ग नेहमी आपल्या नानाविधी रूपाने मला मोहित करत असतो. संपूर्ण जगभरात १३५ सागरी सस्तन प्राणी प्रजाती आढळून येतात ज्यात अजस्त्र अश्या देवमासे आणि डॉल्फिन यांचा समावेश होतो. यातील २८ प्रजाती ह्या भारतीय सागरी क्षेत्रात दिसल्याची नोंद संशोधक मंडळी ने आपल्या येथे केली आहे. जगातील सगळ्यात विशाल असे नीले देवमासे आपल्या किनारी निश्चित रीत्या विहार करताना अकस्मित रीत्या मासेमारी करणाऱ्या मंडळी पाहतात.      खोल आणि मुख्य समुद्र किनाऱ्यापासून दूर जेव्हा आपण सागरात विहरत असतो तेव्हा अचानक आपल्या बोटी...

हिन्दी निबंध _ आंतराष्ट्रीय महिला दिन विशेष (२०२२ )

Image
                         भारतीय समाज में   महिलाओं की बहु-कार्य भूमिका  (Multitasking woman in India)                                                               तू अबला तू ललना न तू सैरंध्री                  तू दुर्गा, तू चंडी, उठ पुरंध्री      यह एक पुरानी कहानी है जो करीब 157 साल पहले की है। यह पश्चिमी चिकित्सा की पहली भारतीय महिला डॉक्टर डॉ आनंदीबाई गोपाल जोशी की कहानी है। यदि आप भारतीय समाज में महिलाओं की बहु-कार्य भूमिका को समझने में रुचि रखते हैं तो यह प्रत्येक भारतीय के लिए एक प्रेरणादायी उदाहरण है। जब न केवल महिलाओं के लिए बल्कि किसी भी पुरुष के लिए उच्च शिक्षा प्राप्त करना मुश्किल था , उस समय डॉ आनंदीबाई जी जोशी ने मौजूदा सामाजिक शासन , जातिवाद और असमानता के साथ संघर्ष किया। उन...

माझ्या कविता- थोरो आणि पाऊस

Image
थोरो आणि  पाऊस   टप-टप  टप -टप करणारा  सततचा पाऊस    रप रप करणारी हि  काळी माती  भिरभिरणारे हे भ्रमर फुलांवर    आडोसा शोधणारे संसार रस्त्या रस्त्यावर  II१II आजकाल तो काही दिन ऋतू पाहून येत नाही  बरसत असतो अहोरात्र बरसत असतो  तिकडे जेथे आंबा मोहरला आहे आणि तेथेही जेथे कापूस फुलत आहे  अचानक, बेभान, बेहिशोबी आणि अकल्पित   II२II अंदाज तर माणसांचे नेहेमी चुकतात हिशोबी दुनियेत  पण ज्यांच्या अंदाजाने दुनिया झुकते  तेही आता जरासे हतबल झालेत वाढत जाणाऱ्या तापमानाने  वितळत जाणाऱ्या हिमनगाणे, जमिनीवर झेपावणाऱ्या महासागराने   II३II आमचा आजूस बोलायचा बाला हाव बरी नाही    पण आम्ही पोरं जरा जास्तच शिकलो शाळा  म्हणूनच आज एका दारी चार गाड्या आणि बायकोला ढिगभर साड्या      प्रतिनिधित्व करत आहेत आमच्या निसर्ग विन्मुख जीवनशैलीचे   II४II वाचतो मी आता थोरो, टागोर आणि टॉलस्यटॉय  उमजण्या मार्ग निसर्ग सुसंगत जीवनाचे  म्हणुनच मी म्हणतो आता त्याला  त्य...

मी, पुस्तके आणि जीवन

Image
  एक राजयोगी मी अनुभवलेला - स्वामी विवेकानंद    आठवत नाही त्या दिवशी काय तारीख होती परंतु तो दिन माझ्या भाग्याचा होता. २००५ च्या उन्हाळी सुट्टीला मी माझ्या आजोळी होतो. दुपारची जेवणं संपवून सर्व जण ओसरीत पहुडले होते. साधारण साठी पार झालेली माझी आजी कोणती तरी जुनी पुस्तके हळुवार पणे वाचत होती. अश्या वेळी मी देखील त्या जुन्या वाळवी लागलेल्या पुस्तकांच्या रद्दीतून काही खास मिळेल का म्हणून शोधू लागलो. एक पान हाती आले ज्यावर लिहले होते "गीता वाचन करण्या परी फ़ुटबाँल खेळून तुम्ही देवाच्या अधिक जवळ जाऊ शकता, तुम्ही जितक्या  वेगाने त्या फ़ुटबाँल ला किक मारू लागत तसे तुमचे शरीर चांगले सुदृढ  होईल मग तुम्हाला गीता अधिक चांगली कळेल. तुमच्यातील रक्त थोडे शक्तिशाली झाले मग तुम्ही भगवान श्रीकृष्ण ची महती आणि अर्जुन चं  श्रेष्ठत्व समजू शकता" हे बोल होते पु. स्वामी विवेकानंद यांचे. दहावी च्या परीक्षेसाठी रामकृष्ण मिशन ची स्थापन कोणी केली? उत्तर- स्वामी विवेकानंद; या महान व्यक्तिमत्व बाबत माझी इतकीचं  काय ती माहिती. परंतु असे विधान हे स्वामी...

पुस्तके आणि गांधीजी

Image
मला उमजलेले 'गांधीजी'  काल संपूर्ण देशात गांधी जयंती निमित्त सुट्टी होती. बहुसंख्य सरकारी कार्यालये आणि काही प्रमाणात खाजगी क्षेत्रात देखील काम करणारी मंडळी घरी होती. दिवसभरात बऱ्याच मंडळी ने विविध माध्यमातून 'महात्मा गांधी' यांना स्मरून व्हाट्सअप व फेसबुक वर स्टेट्स ठेवले. काही असो एक संमिश्र भाव मी सोशल मीडियावर गांधी जयंती निमित्त अनुभवला. दिवस उतरणीला लागला आणि आणि अचानक लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज, अहिंसा, इंग्रजा विरोधी लढा सोबतच नथूराम गोडसे आणि त्यांची बंदूक असे तुलना करणारे काही पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालू लागले. पोस्ट करणारे काही जण परिचित होते तर बहुसंख्य अज्ञात होते.   विचार अभिव्यक्ती हि आपल्या संविधांनात दिलेली आपल्याला फार मोठी देणगी त्यामुळे आजकाल कोण काय बोलेल याचा काही नियम नाही. असो या लेखाच्या पहिल्या परिच्छेदात जे मी लिहलं त्याचे अर्थ काय असू शकतात हे सर्व सुजान भारतीयांना माहित आहेत.    २००५ मध्ये मी दहावी ची परीक्षा दिली आणि त्या सुट्टीच्या वेळी मी मामांच्या गावी न जाता टायपिंग च्या शिकवण्या केल्या. या दरम्यान सकाळी अकरा...

सागर कथा - भाग २

Image
  नारळी पौर्णिमा -  सागर पूजन ते  सागर  संवर्धन आज सकाळपासून शुभेच्छाचा वर्षाव सुरु झाला. मी एक मासेमारी समाजातील व्यक्ती आहे म्हणून माझ्या परिचयातील मंडळी आर्जवून मला 'नारळी पौर्णिमा' च्या उत्सवा निमित्त शुभ संदेश पाठवत होते. यातील एक सवांद मात्र मला जरा व्यथित करून गेला. कारण समोरली व्यक्ती फोनवर म्हणाली कि "नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आज तुमचा फार मोठा सण" मी उत्तरलो तुमचा? अहो हा सण केवळ माझा किंवा आमचा नव्हे तर या भूतळावर जगत असलेल्या समस्त मानवी सभ्यतेचा.     आपल्या येथे बहुसंख्य समाज धारणेत एक चुकीची विचार पद्धत फार प्रचुरतेने दिसून येते ती म्हणजे स्वतःला एका विशिष्ठ संकुचित विचार धारेत अडकून घेणे. समाजाला, देशालाच नव्हे तर ज्यांनी अखंड मानवी समाज रचनेला खूप काही अद्भुत असे विचार आणि प्रयोग दिले त्या 'विचारशील व्यक्ती ' ना आपण विशिष्ठ अश्या समाजासोबतच कायमचं बांधून टाकतो. त्याच बरोबरीने हजारो वर्षांपासून चालत आलेल्या रीती, परंपरा आणि कार्यप्रणाली यांना एक तर आपण त्या त्या धर्म, जात, समाज घटक आणि विशिष्ठ प्...

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५

Image
  वादळ वाऱ्य सुटलं गं – बॉटम ट्राल व सागरी अधिवास   कोचीन बंदरापासून काल संध्याकाळी बाहेर आलो होतो. साधारण सायंकाळी ५ वाजता बोट आम्ही किनाऱ्यावरून बाहेर काढली. मोठे जहाज आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या मार्गिकेतून फिशरी सर्व्ह ऑफ इंडिया ची बोट ‘मत्स्य वर्षणी’ जीच्यावर आम्ही स्वार होतो ती सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास आम्ही नांगर टाकून स्थिर केली. साधारण केरळ राज्याची सीमा संपून कर्नाटक सुरू होतो आश्या किनारा लगत असलेल्या ठिकाणाहून आम्हाला खोल समुद्रात २१२ सागरी मैल एवढं अंतर कापायच होतं. सध्या बोट जिथे स्थिर उभी होती तिकडून उत्तर दिशेला १३०-१५० सागरी मैल एवढं अंतर तत्पूर्वी किनार्यालगत पार करण अनिर्वाय होतं. मान्सून पाऊस आणि वारा आम्हाला चांगलाच झोडपून काढत होता. १२ सागरी मैल प्रती तास वेगाने प्रवास करणारी आमची बोट या वादळ वाऱ्यात हेलकावे खात ३-४ वा ६-७ एवढंच वेग गाठू शकत होती. ती तरी काय करेल बापडी भारत सरकार च्या फिशरी सर्व्ह विभागात ४० वर्ष सेवा बाजावून ती अगदी थकून गेली होती. एवढं मात्र खरं की वार्षिक पर्यवेक्षण आणि देखफाल सातत्याने होत असल्यामुळे ती अगदी अनुभवाचे ऊन पाऊस पाह...