
नाखविणीची खाडी आणि मुबंईचा कोळी माणूस साधारण गेल्या दीड वर्षांपासून मी माझी समुद्रविज्ञानचा विदयार्थी म्हणून जी भूमिका घेऊन महाराष्ट्राचा समुद्र आणि खाडी किनारे पहिले त्यांत भर म्हणून एक अनुभव आज तुमच्या समोर मांडत आहे. ७२० किमी चा आपला किनारा आणि या दर्यावर अधिराज्य गाजवणारा आपला कोळी समाज. आज विविध विकास कामे मुंबईच्या समुद्रा लगत सतत चालू आहेत, पण या धामधुमीत या आपल्या समाजाला या भूमिपुत्राला हद्दपार करण्याचा कट जणू रचला जात आहे . कित्येक कोळीवाडे आणि गावठाणे आज विविध कारण सांगून संपवली जात आहेत. परंतु मुबंई आहे कोळ्यांची नाय कोणाच्या बापाची हीच गोष्ट धरून आपण आपली भूमिका मांडत आहोत. समुद्र संवर्धक म्हणून माझी भूमिका बजावताना एक इतिहास आणि भूतकालीन तथ्य यांची सांगड घालणे हि देखील महत्वाची गोष्ट आहे. खाडी किनाऱ्या लगत असलेल्या चिखल (Mud flat) आणि गाळ यात कित्येक समुद्री जीव आणि वनस्पती आढळून येतात या खाद्यवर अवलंबून कित्येक पक्षी आज आपल्या किनाऱ्यांवर विचरण करत असतात. ठाणे -ऐरोली फ्लेमिंगो अभयारण्य चा भाग हा असाच समुद्री जीव ...