नभ प्रेमाचा _ माझ्या कविता

नभ प्रेमाचा खरं आहे उधळून टाकून द्यावं लागत आयुष्य सारे प्रेम करण्यासाठी लोकं म्हणतात तो किंवा ती प्रेमात पडली आणि पागल झालीत पडली असं म्हणतात तेही योग्य कारण पडल्यावरचं प्रेम होत डिग्री, संपत्ती, पद, प्रतिष्ठा आणि अंहकार ठेऊन माणसं उभी असतात जेव्हा यांतील साऱ्या गोष्ठी गळून जातात तेव्हा तर पडतो आपण प्रेमात !!१!! माझ्यापेक्षा कोणीतरी मला अधिक महत्वाचा वाटतो तेव्हा असतो आपण प्रेमात मग ते प्रेम कोणावरही का असेना, चमकणाऱ्या चादण्यांवर किंवा स्वप्नातील परी वर निवडुंगाच्या उमलणाऱ्या फुलांवर किंवा शिवबां च्या गड दुर्गावर मरण स्वीकारून सैन्यात भरती होणाऱ्या नेमणुकीवर कि तिच्या एका नजरेवर !!२!! भित्री माणसे कधी पैज लावत नाहीत आणि पैज लावणारे कशालाही भीत नाहीत माहित असते आपल्याला कि निकाल काय कोणाच्याही बाजूने लागू शकतो परंतु यावर दृढ विश्वास असतो कि जिंकू तर अति नाहीतर माती हिशोब ठेवण्यात काही अर्थ नसतो प्रेमाच्या राज्यात कारण इकडे देतो तो श्रीमंत होतो !!३!! आजकाल लोक फार प्रॅक्टिकल झ...