पुस्तके आणि गांधीजी
मला उमजलेले 'गांधीजी' काल संपूर्ण देशात गांधी जयंती निमित्त सुट्टी होती. बहुसंख्य सरकारी कार्यालये आणि काही प्रमाणात खाजगी क्षेत्रात देखील काम करणारी मंडळी घरी होती. दिवसभरात बऱ्याच मंडळी ने विविध माध्यमातून 'महात्मा गांधी' यांना स्मरून व्हाट्सअप व फेसबुक वर स्टेट्स ठेवले. काही असो एक संमिश्र भाव मी सोशल मीडियावर गांधी जयंती निमित्त अनुभवला. दिवस उतरणीला लागला आणि आणि अचानक लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज, अहिंसा, इंग्रजा विरोधी लढा सोबतच नथूराम गोडसे आणि त्यांची बंदूक असे तुलना करणारे काही पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालू लागले. पोस्ट करणारे काही जण परिचित होते तर बहुसंख्य अज्ञात होते. विचार अभिव्यक्ती हि आपल्या संविधांनात दिलेली आपल्याला फार मोठी देणगी त्यामुळे आजकाल कोण काय बोलेल याचा काही नियम नाही. असो या लेखाच्या पहिल्या परिच्छेदात जे मी लिहलं त्याचे अर्थ काय असू शकतात हे सर्व सुजान भारतीयांना माहित आहेत. २००५ मध्ये मी दहावी ची परीक्षा दिली आणि त्या सुट्टीच्या वेळी मी मामांच्या गावी न जाता टायपिंग च्या शिकवण्या केल्या. या दरम्यान सकाळी अकरा...