मला उमजलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार विश्व

मी तेव्हा कुलाबा महानगर पालिकेच्या मराठी माध्यमाच्या तिसऱ्या इयत्तेत होतो जेव्हा सर्वांत पहिल्यांदा गौतम बुद्ध यांच्या विचार आणि कार्याची ओळख मला झाली. निमित्त होतं भाषणाच्या स्पर्धेत तिसरा आलो म्हणून मला बक्षीस म्हणून भेट दिलेलं पुस्तक. प्रसिध्द लेखिका लीला जॉर्ज यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचे ते अनुवादन होत ज्याचं शीर्षक होतं 'गौतम बुद्ध'. सोपी भाषा आणि आकर्षक रंग, चित्रे आणि पाली भाषेतली अवतरणे यांमुळे मला ते पुस्तक फार भावलं. आतापर्यंत जवळपास ५० हुन अधिक वेळेत मी त्या पुस्तकाची पारायणे केली. तेव्हा माझं वय साधारण ८-९ इतकं असेल परंतु तेव्हा देखील त्या विचारांची माझ्या मनोपटलावर पडलेली छाप आज देखील कायम आहे. अकरावी ला असताना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रँथालयात मी पहिल्यांदा प्रवेश केला. विज्ञान शाखेतील विदयार्थी म्हणून नियोजित शैक्षणिक पाठ्य पुस्तकांपेक्षा मला या ग्रँथालयातील पुस्तके अधिक जवळची वाटू लागली होती. तेथेच पहिल्यांदा मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आणि कार्य विश्वाचा परिचय झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेख आणि भाषणे याचे महाराष्ट्र शा...