अनुज्ञा विझता विझता स्वतःला सावरलं नाही, नाही असं नाही तगमग यांची की सर्वांना समजून घेताना, स्वतःला कोणीच समजलं नाही भीती यांची की व्यक्त करू की नको खंत मनातली, दुसऱ्याला जपण्यासाठी जर आपणच असू जबाबदार इतरांच्या दुःखासाठी, मग टाकून मोडू नांगी आत्म सन्मानाची संवेदनशीलता इतकी 'तिला' जपण्यासाठी, विझता विझता स्वतःला सावरलं नाही असं नाही पद, पैसे आणि स्वातंत्रा म्हणजे तोडू सगळी नाती, मी आणि माझं घरटं उबदार करण्यासाठी विझू लागली आहे माझ्या मनातली माया-ममतेची ज्योती, नको आता मला त्यात स्नेहल तुपाची आहुती उद्रेक होत आहे मनात शेवटी सोडून जात आहे धरती, विझता विझता स्वतःला सावरलं नाही असं नाही 'तो' नाही रडू शकत नाही मोडू शकत, त्याला सामाजिक खोट्या 'पुरुषत्वाची' रीती अंध भक्ती आणि प्रेम स्वार्थी, कोनाड्यातला खोटा अहंकार जपण्यासाठी हरतो आहे 'तो' त्या प्रत्येक वेळी आई, पत्नी, मुलगी, मैत्रीण आणि ताई समजून घेण्यासाठी खरं सांगतो फार बरं नसतं टोकदार वळणावर, नातं थोडं आणखी चवदार करण्याची मला भीती शब्दच होतात माझ्या शेवटच्या प्रवासातले खरे सोबती, विझता विझता स्वतःला जपलं ...
Posts
Showing posts from April, 2023