
बदलणारी मुंबई आणि चिरंतन विकास मुंबई कोळ्यांची आणि भंडाऱ्यांची अशी ओळख असलेली, सात बेटांचा समूह असलेली नारळीच्या बागा आणि आद्र दमट हवा, सुंदर समुद्रकिनारा आणि शांतता अशीच ओळख होती मुंबईची १८ व्या शतकापर्यंत. मजल दरमजल करत आपल साम्राज्य विस्तारासाठी इंग्रज साहेबानी मग या मुंबईच नामकरण बॉम्बे असं केल. परस्परांना जोडणारी बेट आणि खाड्या यावंर कुठे पुल उभारले गेले तर कुठे समुद्रात भराव टाकला गेला. सात बेटांची नगरी हळूहळू आता एका नगरात अणि मग महानगरीत रूपांतरित झाली. गोरा इंग्रजी साहेब आला आणि गेला या कालखंडात आपण कित्येक गोष्टी अनुभवल्यात. काही भाग जुलुमांचे आणि अन्यांचे होते तर काही भाग यशाचे आणि उत्कर्षाचे होते. १६ एप्रिल १८५३ मध्ये बोरीबंदर ते ठाणे या दरम्यान भारतातील पहिली ट्रेन धावली तीही मुंबईत. गतिशील चाकाबरोबर जीवनमानाला गती आली . छोटी मोठी नगरे कोळीवाडे आणि बाजारपेठा आता स्मार्ट सिटी मोनो आणि मेट्रो यांच्यात परावर्तित घेण्यासाठी तयारी करत आहे . १९३४ मध्ये लालबाग परिसरात एका सार्वजनिक गणेशत्सव...