बदलणारी मुंबई आणि चिरंतन विकास 


   मुंबई कोळ्यांची आणि भंडाऱ्यांची अशी ओळख असलेली,  सात बेटांचा समूह असलेली नारळीच्या बागा आणि आद्र दमट हवा,  सुंदर समुद्रकिनारा आणि शांतता अशीच ओळख होती मुंबईची १८ व्या शतकापर्यंत.  मजल दरमजल करत आपल साम्राज्य विस्तारासाठी इंग्रज साहेबानी मग या मुंबईच नामकरण बॉम्बे असं केल.   परस्परांना जोडणारी बेट आणि खाड्या यावंर कुठे पुल उभारले गेले तर कुठे समुद्रात भराव टाकला गेला. सात बेटांची नगरी हळूहळू आता एका नगरात अणि मग  महानगरीत रूपांतरित झाली. गोरा इंग्रजी साहेब आला आणि गेला या कालखंडात आपण कित्येक गोष्टी अनुभवल्यात. काही भाग जुलुमांचे आणि अन्यांचे होते तर काही भाग  यशाचे आणि उत्कर्षाचे होते. 
   १६ एप्रिल १८५३ मध्ये बोरीबंदर ते ठाणे या दरम्यान भारतातील पहिली ट्रेन धावली तीही मुंबईत. गतिशील चाकाबरोबर जीवनमानाला गती आली . छोटी मोठी नगरे कोळीवाडे आणि बाजारपेठा आता स्मार्ट सिटी मोनो आणि मेट्रो यांच्यात परावर्तित घेण्यासाठी तयारी करत आहे . १९३४ मध्ये लालबाग परिसरात एका सार्वजनिक गणेशत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली . गणपती चतुर्थी आणि अनंत चतुर्थी यांचं चक्र अव्ह्यात रित्या चालू राहीली,   आणि आज २०१८ पर्यंत या मंडळाची अभूतपूर्व बदल अनुभवला . हा प्रवास आपण आजही पाहतो तो म्हणजे आपला लाडका लालबागचा राजा च्या स्वरूपात. ५० रुपया पासून ५० करोडापर्यंत आज गणेतोत्सव आणि इतर सार्वजनिक उत्सव मुंबईत चालू आहेत.  सांगायचा मुद्दा होणारा बदल समजून घेणे आणि त्या बदलाचा साक्षीदार होणे . या बदलाचा साक्षीदार ठरला आहे आपलं लाडक बंदर अर्थात ससून डॉक. १८७५ पासून आज २०१८ पर्यंत सतत होणार बदल ह्या बंदराणी पहिला.  ५ जहाजांसाठी असलेला बंदरापासून आज १००० बोटी या बंदरात उभ्या असतात . पाण्याची निळी निळाई  आता गडद काळ्या तेलकट रंगात बदली आहे. 
  मुंबई अपडेट होत आहे  पुन्हा मी फुलणार आहे म्हणून आज विकासासाठी हजारो झाड आणि रस्ते अहोरात्र खोदले  जात आहेत  . कारण काही असो, मोनो, मेट्रो कारशेड वा सी लिंक शेवटी वापरणारे आपणच .
   १०० वर्षांपूर्वी इतक्या भव्य छत्रपती शिवाजी टर्मिनलची आपणांस गरज नव्हती परंतु आज ती भव्यता हि आपणास कमी पडत आहे. आज सी लिंक मेट्रो मोनो यांची गरज तितकीशी नाही पण काळाच्या वेगात टिकण्यासाठी भविष्यात यांची आवश्यकता भासेल. १६ अब्ज रुपये खर्च करून आपण वांद्रे वरळी सी लिंक बांधला. किंमत पैशांच्या व  वेळेच्या स्वरूपात मोजली परंतु आज हि गोष्ट फायदेशीर ठरते आहे . पण आपण काही गोष्टी डोळे झाकूण विसरलो ते अर्थात समुद्राचा विनाश आणि प्रदूषण. आता येणार आहे. कोस्टल रोड आणि आणखी बरेच काही. 
  उत्सव प्रिय खलू मानवा . उत्सव यांसासाठी असतात कि जीवनाचा त्राण कमी करून  त्यात आनंद   भरावे. पण त्याच बरोबर आपल्यात ते प्रबोधन करावे अशी हि या मागची एक बाजू असते. उत्सवाचा एक भाग असतो प्रेयस आणि एक भाग असतो श्रेयस. प्रेयस अर्थात अशी गोष्ट जी आपणांस आवडेल आणि मनाला भावेल परंतु त्याचबरोबर श्रेयस अर्थात          . 
  आई माऊलीचा उदो उदो. कोणती किंमत मोजून आपला विकास करावा हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न . परंतु काळाच्या या बदलात बरेच काही आहे. विकास हवा आहे पण अर्थात  चिरंतन विकास. 




लेखन - प्रदिप नामदेव चोगले
संकल्पना - प्रदिप चोगले आणि दर्शन कोळी

टंकलेखन - विजय नामदेव चोगले

निर्मिती  - 
              सागराणा
creating sustainable oceans resources 
             &
आणि आई एकविरा मच्छिमार संघ 





वर सांगितलेली गोष्ट पहा. खाली क्लिक करा आणि आस्वाद घ्या . 
https://www.youtube.com/watch?v=dfXZLivPSt8&t=33s





Comments

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५