कल्पक चित्रपट आणि संवर्धनाचे धडे
मला बाळपानापासून निसर्ग आवडतो कारण माझ्या बालपण आणि शैशव अश्याच निसर्ग रम्य ठिकाणी कुंडलिका नदीच्या किनारी, रेवदंडा-मुरुड च्या समुद्र किनारी आणि फणसाड अभयारण्य च्या कुशीत गेला. त्यामुळेच मला निसर्ग अधिक जवळचा आणि आपुलकीचा वाटतो. ज्यांना म्हणून असं अनुभव जीवनात असेल अश्या मंडळी हा चित्रपट पाहून अधिक आनंद होईल यात काहीच नवल नाही.
जग फार वेगाने बदलत आहे त्यात 'हवामान बदल' हि संकल्पना आता फक्त पुस्तकी अभ्यासाचा भाग नाही राहिला आहे तर तो आज आपला साऱ्यांचा एक दैनंदिन अनुभव झाला आहे. अवेळी येणार पाऊस, कधी पिढ्यान पिढ्या अनुभवली नाही अशी थंडी आणि वाढत जाणारा असह्य उन्हाळा हे या वातावरण बदलाचे दृश्य परिणाम. त्याच बरोबर शेतात पिकांवर येणारी प्रचंड टोळधाड, मासेमारी करताना समुद्रात मोठ्या प्रमाणात जाळ्यात अडकणारे जेलीफिश हि देशील या हवामान बदलाची चिन्हे. मग अश्यातच आपल्याला ऐकू येते कानी कि काही पक्षी प्रजाती नष्ट झाल्या आहेत तर कधी माझ्या आई-वडिलांनी खाल्लेला भाताचं वाण आता नाही राहिल आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर बऱ्याच सजीव प्रजाती या सगळ्या प्रक्रिये दरम्यान नष्ट होत आहेत.
या चित्रपटाची कथा देखील अश्याच मुद्यांवर नकळत आणि हळुवार पद्धतीने हात घालते ते देखील प्रचंड कल्पकता आणि कर्णमधुर संगीत यांची साथ घेऊन.
एक शहरा पासून दूर निसर्गाच्या कुशीत एक घर वसलेलं असतं ज्यात राहतो एक १४ वर्षांचा मुलगा. एका संपंन्न आणि श्रीमंतीच पदर लाभलेला हा मुलगा त्या घरात राहतो त्यांचा एका वृद्ध मोलकरींनी सोबत. कधी तरी तिकडे त्याची आई आणि मावशी त्याला भेटायला येते. त्याला सोबतीला असतं त्यांच्या ह्रदयाचं कधी हि बरं न होणारा आजार. त्याच घराच्या खाली , त्याच्या पायात आणि बांधकामात ज्या पोकळ जागा असते अश्या जागी एका मुंगी हुन थोड्या अधिक उंचीच्या मानव सदृश्य प्रजातीचं घर. अगदी तसंच जसे आपण राहतो , खातो , पितो आणि वागतो त्या पद्धतीने जगणाऱ्या प्रजातीचा एक कुटुंब. आई , वडील आणि त्यांची धाडसी लेक जिचं नाव असत 'एरिएटी' .
कल्पकता आणि बुद्धिमत्ता यांच एक अभिन्न नातं आहे, व असतं यावर माझा दृढ विश्वास आहे. प्रचंड कल्पना शक्ती ज्यांना लाभली आहे अशीच मंडळी काही तरी अद्भुत पाहू शकतात किंवा त्या बद्दल विचार करू शकतात. यंदा ची दिवाळी खऱ्या अर्थाने मला कल्पना शक्ती चं तेज देत आहे असंच मला वाटतं. त्याला कारण देखील तसंच काहीस आहे. काही ठरुवून नाही पण सहजच दोन दिवसात नेटफ्लिक्स वर एक ऍनिमेटेड मुवि पाहता आला ज्याचं नाव होतं 'एरिएटी' २०१० मध्ये जपान मध्ये प्रदर्शित झालेली हि मुवी.
एरिएटी तिच्या आई आणि वडील यांसोबत एका अतिशय छोट्या परुंतु टुमदार अश्या जगात राहत असते. तिच्या घरात चहा बनवण्यासाठी लागणारी साखर, कपडे म्हणून लागणारे टिशु पेपर आणि बरच काही हि बटू मंडळी त्या मोठ्या घरात राहणाऱ्या मंडळी त्यानं नकळता वापरत असतात. यात फक्त एकच अलिखित नियम तो म्हणजे स्वतःचा अस्तित्व हि लहान मनुष्य प्रजाती इतरांना दाखवून देत नाहीत. दुर्देवाने एके दिवशी या लहानग्या एरिएटी ची भेट त्या घरात राहणाऱ्या १४ वर्षाच्या मुलासोबत होते. यात अत्यंत सध्या शब्दात जो संवाद घडतो तो अखंड मनुष्य जातीचं प्रतिनिधीत्व करणार असतो. कश्या पद्धतीने स्वतःला हुशार समजवणारी मनुष्य प्रजाती हे सुंदर जग नष्ट करत आहेत हे आपल्याला यात कळते. परंतु जेव्हा कुशाग्र बद्धिमतेला संवेदनशील हृदयाची सोबत मनुष्य करतो तेव्हा खऱ्या अर्थाने निसर्ग संवर्धन घडते.
हा चित्रपट कोणी पहावंतर ? ज्यांना संवेदनशील हृदय आहे, अन्याची चाड आहे, कल्पकतेची आवड आहे आणि हे सुंदर जग आणखी सुंदर करण्याची अभिलाषा आहे अश्या सर्वानीच. समुद्र संशोधन आणि निसर्ग संवर्धन यांची मला प्रचंड आवड आहे. किंबहुना हेच माझं जीवन आहे.
हा लेख या दिवाळी निमित्त मी समर्पित करतो तेजोमय ज्ञान देणाऱ्या पुस्तकांना आणि 'एरिएटी' सदृश्य चित्रपट निर्मिती करणाऱ्या मंडळी यांना.
आपणांस दिवाळी निमित्त तेजोमय शुभेच्छा ......
लेखक
प्रदिप नामदेव चोगले
दिनांक २/११/२०२४ ; २०:५३
टीप: - आपल्या प्रतिक्रिया आपण खाली कमेंट मध्ये लिहून कळवू शकता. किंवा अधिक माहिती आणि या बद्दल चर्चा करण्यासाठी संपर्क करा ९०२९१४५१७७ / pradipnc93@gmail.com
Comments
Post a Comment