अनंत चतुर्दशी - अनुभूती अनंत आनंदाची....


  सर्वांना गणरायाच्या आगमनाने खूप आनंद झाला आहे, सर्वत्र उत्साह आणि प्रसन्नतेच वातावरण आहे. मोरया आपल्या घरात गेल्या १० दिवसापासून आला व आपल्या सोबत राहिला.  पाहुणचार घेऊन बाप्पा आता निघण्याच्या तयारीला आहे. "जाऊ नको रे गजानना दुःख  वाटते माझ्या मना" अशी मनाची सर्वत्र अवस्था झाली आहे. याच निमित्ताने आजचा हा लेख मी  ऐका वेगळ्या दृष्टिकोन समोर ठेऊन लिहिण्याचा मी प्रयत्न करत आहे.

  आजकाल सर्वत्र भारतीय सण आणि उत्सव यांची सांगड पर्यावरण प्रदूषणाबरोबर लावली जाते. एक गट आपल्या समाजात पर्यावरण पूरक उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्नशील असतो तर दुसरा गट या गोष्टीला टाळून उत्सवाची पारंपरिकता जपत फक्त सण साजरे करण्यावर भर देताना दिसून येतो. कोण चूक आणि कोण बरोबर असं भेद करण्यात काहीच अर्थ नाही कारण काही थोड्या बहुत मुदयांवर दोन्ही गट बरोबर असतात आणि काही बाबी बद्दल दोन्ही गटातील मंडळी  चुकीची असतात. तर मग काय आहे ही गंमत-गोष्ट मी तुम्हाला आज काही संदर्भ ग्रन्थ  आणि शोधपत्रिके च्या वरून स्पष्ट करण्याचा आपण येथे प्रयत्न करू या.

  उत्सव मानवी जीवनात उत्साह आणि जोश भरतात. भारतीय संस्कृती मध्ये अश्या उत्सवांची एक मोठी परंपरा आणि सुंदर गुंफण आपणांस पाहायला मिळते. रोजचं रुटीन वा दैनंदिन जीवनातील तोच-तोचपणा कमी करून जीवन आनंदी करण्यासाठी ऋषीमुनी नि आपल्या येथे हि सणाची गुंफण केली आहे. काही सण ऋतू बदलाचे स्वरूप साजरे करणारे असतात तर काही सण विशिष्ट देवदेवतांचे उपसना स्वरूप म्हणून असतात. सण कोणता हि असो प्रत्येक सणाचे दोन भाग असतात एक 'श्रेयस' आणि दुसरं 'प्रेयस' होय. एक गोष्ट प्रत्येक सणांमध्ये आपल्याला प्रिय असणाऱ्या गोष्टी साठी असते ज्यामुळे आपल्या इंद्रियांना आनंद आणि स्वाद मिळतो आणि शरीर पुष्ट होत. पण यांच बरोबर ऐक वेगळा भाग असतो तो म्हणजे ' श्रेयस' म्हणजे असं तत्वज्ञान आणि कल्पना प्रत्येक उत्सवासोबत असते ज्यामुळे आपण या निसर्गाकडे सकारात्मक पद्धतीने पाहू शकतो. निसर्गाचं फक्त उपभोग नाही तर या प्रकृतीकडे उपासना आणि सौन्दर्य दृष्टिकोनाने पाहू शकतो.

  गणेश मूर्ती विसर्जन आणि पर्यावरण प्रदूषण या बाजूने आपण जर काही संशोधन पत्रिकेचा तपशील पाहिला तर आपणांस लगेच या गोष्टीची तीव्रता समजू शकते. फार पूर्वीपासून आपल्या कडे गणेश मूर्ती या शाडूच्या मातीपासून बनवल्या जात. त्यांना सजवण्यासाठी नैसर्गिक रंग आणि गेरू याचं वापर केला जात असे. परंतु आता या गोष्टीची जागा कृत्रिम रंग आणि रसायने यांनी घेतली आहे. मूर्ती ला सुशोभित करण्यासाठी प्लॅस्टिक पेंट आणि कृत्रिम खडे आणि मोती वापरले जातात. प्लॅटर ऑफ पँरिस, कृत्रिम धागे आणि पेपर यांपासून आजकाल मोठ्या प्रमाणात श्री च्या  मूर्तीची निर्मिती केली जाते( गुप्ता आणि इतर २०११). अश्या स्वरूपात निर्माण केलेल्या श्री च्या मूर्ती मुले मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण होत आहे (मेहता २०१३). नैसर्गिक  पाण्याचे स्त्रोत जसे की नदी आणि तलाव त्यांच्यावर यांमुळे खुप जास्त हानी पोचत आहे. गणेश मूर्ती विसर्जन आणि देवी मूर्ती विसर्जन त्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणा बद्दल कित्येक शोध निबंध लिहले गेले आहे. विसर्जन पूर्वी, विसर्जन कालावधीत आणि विसर्जन नंतर बदलणाऱ्या पाण्याच्या गुणधर्माचा अभ्यास करण्यात आला आहे. यात पाण्याच्या तापमन आणि आम्लता यांच्यात कमालीची तफावत जाणवते. याच गोष्टीचा विविध जाहिराती आणि दूरदर्शन मालिकांमधून आपल्यावर या सतत भडिमार देखील  होत असतो. मग काय खरंच असं असताना आपण काय भूमिका घेतली पाहिजे?

  अनंत चतुर्दशी आणि भारतीय तत्वज्ञान यांची भूमिका जर आपण समजून घेतली तर लगेच आपणांस आपली चूक लक्षात येईल. प्रत्येक कार्याचा शुभारंभ गणेश पूजनाने होतो आणि प्रत्येक गोष्टीचा प्रारंभ करता म्हणून आपण गणरायला पूजतो. भारतीय संस्कृती मध्ये हि एक अशी उपास्य देवता आहे ज्याच्या नाम आणि रुपात खुप सखोल अर्थ आहे. या गणपती मूर्ती मध्ये प्रचंड मोठ्या अश्या तत्वज्ञानाचा गाभा आहे. गणेश चतुर्थी च्या निमित्ताने आपण बदलणाऱ्या निसर्गाचं स्वागत करतो. विश्वाचं कोड उलगडताना आपल्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता असायला हवी परंतु या बुद्धी बरोबर किंबहुना बुद्धी पेक्षा जास्त मनाचा भाव आणि सोंदर्य दृष्टिकोन असायला हवा अशी शिकवण गणपती देवाच्या गजदन्त कडून मिळते. जीवन जगताना बऱ्याच गोष्टी आपण कानांनी ऐकतो परंतु यातील असार गोष्टी सोडून फक्त योग्य गोष्टी आपण आपल्या जीवनात स्वीकारल्या पाहिजे. हि शिकवण बाप्पाच्या कानांद्वारे आपण समजून घेतली पाहिजे.  ह्या चराचरात व्यापून असलेल सत्य साकार स्वरूप होऊन १० दिवस आपल्या घरात येत परंतु, अनंत चतुर्थीला हे साकार स्वरूप पाण्यात जाऊन व्यापक असं निराकार अनंत स्वरूप धारण करत.

   एक समुद्री प्राण्याचं अभ्यासक आणि विज्ञाचा विदयार्थी म्हणूंन जेव्हा मी हि गोष्ट समजून घेतली तेव्हा काही कोडी पटकन सुटली. आज सर्वत्र विकास कामे आणि आधुनिक बांधकाना वेग आला आहे. Mumbai Update होणार आहे म्हणून मोनो आणि मेट्रो च्या नावाखाली कित्येक झाडं आणि नैसर्गिक अधिवास आपण नष्ट करत आहोत. समुद्र किनारी निर्माण
होणाऱ्या अनुभट्या, बंदरे  आणि समुद्री रस्ते यांच्या मुळे विकासाच्या पायाखाली कित्येक गोष्टी चिरडल्या जात आहेत. निसर्गावर केलेली हि चाल निसर्ग वेगळ्या स्वरूपात आपल्यावर परतवत आहे. Climate change आणि हिमनगाचे वितलने हि या गोष्टीची सूचक आहेत.

  फक्त बुद्धी ने पाहिलं तर निसर्ग आपल्याला उपभोगाची वस्तू वाटते आणि सुरु होतो फक्त माणसाच्या फायद्याचं विचार. आणि फक्त भावनेनं पाहिलं तर सुरु होते आरती, पूजा आणि प्रसाद यात अडकलेली भक्ती आणि यांमुळे होणारी निसर्गाची हानी. परंतु आज गरज आहे या भक्तीला सामाजिक शक्तीमध्ये रूपांतरित करायची. तसेच या उत्सवाला भक्ती आणि बुद्धी दोन्हीच्या समतोलाने समजून साजरी  करण्याची.  

  विश्वातील कणाकणात व्यापून असलेलं हे गूढ तत्व विज्ञानाची कास धरून समजून घेताना आपण मानवी समाजाला प्रगतीपथावर निश्चितच नेलं पाहिजे परंतु त्याच बरोबर श्री गणेशाच्या साकार स्वरूपाला अनंत चतुर्थीला सागरात विलीन करताना सर्वत्र केवळ उपभोग या वृत्ती मध्ये न राहता उपासना म्हणून देखील पाहिलं पाहिजे. आपले पूर्वज आणि प्राचीन तत्वज्ञान यांची सुरेख मैफिल आपण जर जमवू शकलो तर निश्चितच १० दिवसानंतर देखील आपण एक जबाबदार मनुष्य म्हणून जीवन सुंदर करू शकतो. गणपती उत्सव हा निसर्ग पूरक असावा पण त्याच बरोबर त्याला  विज्ञान आणि तत्वज्ञानाची जोड असावी.

गणपती बाप्पा मोरया 
पुढल्या वर्षी लवकर या 


   

     लेखन आणि संकल्पना - प्रदिप नामदेव चोगले









संदर्भ सूची:-

१) भारतीय संस्कृती,  ई-बुक, साने गुरुजी

२) संस्कृती पूजन, पांडुरंग शास्त्री आठवले

३) Gupta AK, Mishra K, Pramod K, Singh C and Srivastava S (2011). Impact of religious activities on the water characteristics of prominent ponds at Varanasi (U.P.) India.
Plant Archives 11(1) 297-300.

४)Mehta P. (2013). Alteration in water quality parameters and consequential impacts due to festival waste in Jodhpur, The Experiment, 2013 Vol. 17(1), 1166-1176.

५) Varsani Alpa (2010). Impact of Ganesh Idol Immersion on Tapi River at Ashwanikumar Ovara. M.Sc. Dissertation, Veer Narmad South Gujarat University Surat.

६) Vyas Anju and Bajpat Avinash (2007). Water quality survey and monitoring study of idol immersion in context of lower lake, Bhopal, India. Proceedings of Taal: The 12th World
Lake Conference, pp 1818-1821.



Comments

  1. पुन्हा एकदा खूप खूप आभार पुढील लेखानासाठी शुभेच्छा

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद धीरज भाऊ, नक्कीच या साठी प्रयत्नशील असेल आणखी उत्तम लिहण्यासाठी

      Delete
  2. पुन्हा एकदा खूप छान लेख लिहला. लेखा पेक्षा प्रबोधन आहे.त्याची आज काळाची गरज आहे.,...🙏🏻 धन्यवाद 🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५