दि. ४ मार्च २०१९, आज डॉ. आनंदी गोपाळ पहिला. समर्पण, शिक्षण आणि ध्येयवादी विचार याचं त्रिवेणी संगम आज अनुभवला. आणखी काही दिवसांनी आयुष्याचा एक नवीन पर्व सुरु होईल. माहित नाही मला कि समर्पणचा गणित मला जमेल वा नाही परंतु एक मित्र एक सोबती आणि एक छान पती म्हणून होण्याची मी भूमिका जगण्याचा प्रयत्न करेल. स्त्री म्हणून माझ्या आयुष्यात बऱ्याच जणी येऊन नेहमी काही तरी मला भरभरून देऊन गेल्या. माझी आई, मावशी, ताई, आत्या, काकी, मामी, वहिनी, मैत्रिणी, प्रियसी आणि त्याच बरोबर काही स्त्रीया आदर्श आणि प्रेरणा घेऊन आल्या आणि स्थिरावल्या. प्रेम, कारुण्य, त्याग, समर्पण, मैत्री, मेहनत, सुंदरता, नीटनिटकेपणा याची जाणीव मला त्यांमुळे झाली आणि आता ही होत आहे. मी या चित्रपटाद्वारे आज जाणिपूर्वक त्या प्रत्येक 'ती' ला thank you म्हणेल जिच्या मुले माझं आयुष्य समृद्ध झालं. - ( प्रदिप ना. चोगले )
Posts
Showing posts from March, 2019
- Get link
- X
- Other Apps

पुणे दि. ३ मार्च २०१९, आज पुन्हा मुबंई-पुणे-मुबंई मुसाफिरी झाली. सोबत ती होती पण ती नव्हती . या येथे पहिली ती अर्थातच ती 'एसटी' आणि सोबत नसणारी ती अर्थातच ती ×++×. ती तशी छानच पण तिचं ते असणं आणि भान हरपून मला ती ती आहे हे जाणवलं मात्र या येथेच अर्थात पुणे १२. आज पुन्हा मी ते शहर अनुभवलं, अंतरात साठलेल्या आठवणी पुनः एकदा ताज्या झाल्या. आज पुन्हा मी ते झाड पहिले ज्याच्याशी तिची गट्टी जमली होती. पुन्हा ते सोमेश्वरचा गाभारा अनुभवलं. दिनाचा दयाळू आणि योगीयचं आद्य गुरु असं तो भोलानाथ पुन्हा मला पाहून हसला. विचारलं की का रे अजूनही दिसते का तुला हवा आणि अजूनही तुला मातीचं गंध तितकाच भावतो का? माझं उत्तर अगदी सरळ हो भावतो कि. आज रात्री सुरु होणारी महाशिवरात्र माझ्यासाठी लखं प्रकाशात चालू झाली. आज पुनः वाटलं की करून टाकावी पाटी कोरी, आणि विरघळून टाकावा हे देहाचं भान . आज पुन्हा मला ती मिळाली ती, ती ताई जी अंतरीचा खजिना माझ्यासाठी मोकळं करून जाते. आज पुन्हा ती पण मिळाली ती, ती म्हणजे ती जी भोग आणि प्रेम याचं समर्पक अनुभव मला सांगून गेली. आज पुन्हा ते ड...