पुणे दि. ३ मार्च २०१९,
   आज पुन्हा मुबंई-पुणे-मुबंई मुसाफिरी झाली. सोबत ती होती पण ती नव्हती . या येथे पहिली ती अर्थातच ती 'एसटी' आणि सोबत नसणारी ती अर्थातच ती ×++×. ती तशी छानच पण तिचं ते असणं आणि भान हरपून मला ती ती आहे हे जाणवलं मात्र या येथेच अर्थात पुणे १२.
  आज पुन्हा मी ते शहर अनुभवलं, अंतरात साठलेल्या आठवणी पुनः एकदा ताज्या झाल्या. आज पुन्हा मी ते झाड पहिले ज्याच्याशी तिची गट्टी जमली होती. पुन्हा ते सोमेश्वरचा गाभारा अनुभवलं. दिनाचा दयाळू आणि योगीयचं आद्य गुरु असं तो भोलानाथ पुन्हा मला पाहून हसला. विचारलं की का रे अजूनही दिसते का तुला हवा आणि अजूनही तुला मातीचं गंध तितकाच भावतो का? माझं उत्तर अगदी  सरळ हो भावतो कि.
  आज रात्री सुरु होणारी महाशिवरात्र माझ्यासाठी लखं प्रकाशात चालू झाली. आज पुनः वाटलं की करून टाकावी पाटी कोरी, आणि विरघळून टाकावा हे देहाचं भान . आज पुन्हा मला ती मिळाली ती, ती ताई जी अंतरीचा खजिना माझ्यासाठी मोकळं करून जाते. आज पुन्हा ती पण मिळाली ती, ती म्हणजे ती जी भोग आणि प्रेम याचं समर्पक अनुभव मला सांगून गेली.
  आज पुन्हा ते डोळे पाहिले जे मला सतत खुणावतात आणि माझं भूत-वर्तमान-भविष्य  चमकवून टाकतात. आज पुन्हा ती बासरी ओठाशी बिलगून हसली आणि मला पाहून लाजली.
  बरोबर का चूक काय माहित नाही , एवढं मात्र खरं उपभोग आणि उपासना याची अजब मिसळ सद्या आहे माझ्या आयुष्यात. आज डोळे पुन्हा पाणावले पण कारण अद्याप सापडलं नाही.
क्रमश.
              -प्रदिप ना. चोगले
                ( मुबंई- पुणे)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५