
पर्यावरण दिनानिमीत्ताने चिंतन - समुद्रविज्ञान जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, माझ्या सर्व दोस्ताना आणि मला ओळखणाऱ्या सर्व मंडळींना खूप साऱ्या शुभेच्छा. माझं बालपण माझ्या आजोळी गेलं जिथे मी खुप जास्त वेळ निसर्गात रमलो. समुद्र , नदी आणि खाडी यामध्ये खुप वेळ गेला. मासेमारी हि घरचीच त्यामुळे समुद्री जीव आणि समुद्र यांची ओळख सुरवातीपासून झाली. परंतु समुद्रविज्ञान आणि प्राणीशास्त्र विषयात शिक्षण पूर्ण केल्यावर काही मजेशीर पैलुची मला ओळख झाली. ९५% समुद्र आज हि माणसाला अज्ञात आहे. ९०% पेक्षा अधिक खाण्यायोग मोठे मासे आज आपण नष्ट केले आहेत. दररोज लाखो टन प्लास्टिक कचरा आणि इतर गोष्टी आपण समुद्रात टाकत आहोत. सूक्ष्म प्लास्टिक अन्न साखळीतून आज आपला आरोग्य प्रदूषित करत आहे. समुद्री प्रवाळ हि या भूतळावरील एक उत्तम अशी परीसंस्था आहे परंतु वातावरणात उत्सर्जित होत असणारा मोठ्या प्रमाणातील कर्बन डायऑक्साईट महासागराच्या पाण्याची आम्लता वाढवत आहे ज्या मुले समुद्री प्रवाळ भिंतीका ठिसूळ होत आहेत व नष्ट पावत आहेत. कित्येक कवच धारी समुद्री जीवाची अवस्था अंत्यन्त बिकट...