पर्यावरण दिनानिमीत्ताने चिंतन - समुद्रविज्ञान  

 
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, माझ्या सर्व दोस्ताना आणि मला ओळखणाऱ्या सर्व मंडळींना खूप साऱ्या शुभेच्छा. माझं बालपण माझ्या आजोळी गेलं जिथे मी खुप जास्त वेळ निसर्गात रमलो. समुद्र , नदी आणि खाडी यामध्ये खुप वेळ गेला. मासेमारी हि घरचीच त्यामुळे समुद्री जीव आणि समुद्र यांची ओळख सुरवातीपासून झाली. परंतु समुद्रविज्ञान आणि प्राणीशास्त्र विषयात शिक्षण पूर्ण केल्यावर काही मजेशीर पैलुची मला ओळख झाली.
  ९५% समुद्र आज हि माणसाला अज्ञात आहे. ९०% पेक्षा अधिक खाण्यायोग मोठे मासे आज आपण नष्ट केले आहेत. दररोज लाखो टन प्लास्टिक कचरा आणि इतर गोष्टी आपण समुद्रात टाकत आहोत. सूक्ष्म प्लास्टिक अन्न साखळीतून आज आपला आरोग्य प्रदूषित करत आहे. समुद्री प्रवाळ हि या भूतळावरील एक उत्तम अशी परीसंस्था आहे परंतु वातावरणात उत्सर्जित होत असणारा मोठ्या प्रमाणातील कर्बन    डायऑक्साईट महासागराच्या पाण्याची आम्लता वाढवत आहे ज्या मुले समुद्री प्रवाळ भिंतीका ठिसूळ होत आहेत व नष्ट पावत आहेत. कित्येक कवच धारी समुद्री जीवाची अवस्था अंत्यन्त बिकट आहे कारण स्वतःचा कवच निर्माण करणार पोषक वातावरण आपण नष्ट केलं आहे. आपण कोठेही रहात असलो अगदी कोकणात समुद्री किनारी वा दूर कोठे हिमालयात वा
कळसुबाईच्या शिखरावर आपणा साठी लागणार पिण्यायोग्य पाणी आणि प्राणवायू आपणांस या महासागरातून मिळतो.
  समुद्रातील जर गंमती जमती समजून घेतल्या तर बरेच काही असं आहे जे पाहून आणि ऐकून आपण आश्चर्यचकित होऊन जाल. आपणांस दिसणारा समुद्री पाण्याचा सर्वात वरच्या पृष्ठभागापासून २०० मी खोलीचा जो समुद्री पाण्याचा थर आहे त्यात असे कित्येक प्राणी आहेत जे अत्यंत सूक्ष्म असतात ज्याला आपण प्लवक असे म्हणतो. हे समुद्री प्लवक मुख्यता दोन प्रकारात मोडले जातात पहिला प्रकार ज्यास वनस्पती प्लवक(phytoplankton)  असे म्हटले जाते तर दुसऱ्या प्रकारात प्राणी प्लवक(zooplankton) मोडतात.  हि प्लवके हीच या भूतलावरील प्राणवायू निर्माण करणारी सर्वात मोठी नैसर्गिक यंत्रणा आहेत. आज सर्वत्र झाडे लावा झाडे जगवा याच नारा आपणास ऐकू येतो परंतु, जमिनीवरील झाडांपासून जो प्राणवायू आपणस मिळतो त्या पेक्षा कित्येक पटीने अधिक प्राणवायू आपणांस या प्लवका पासून मिळतो. आपण निर्माण करणारा बहुसंख्य कर्बन    डायऑक्साईट हि प्लवक वर्गातील जीव शोषून घेतात आणि आपली पृथ्वी अधिक जीवनास पोषक बनवतात.
  समुद्री पाण्याच्या १००० मी खोली च्या पाण्याच्या थरातील भागात एक अद्भुत सोहळा आपणांस पाह्यला मिळतो ज्यात समुद्रातील कित्येक जीव गंमतीदार पद्धतीने रंगीत प्रकाश निर्माण करतात. एडिथ विडर या संशोधक महिलेने समुद्रात खोलवर राहणारे आणि प्रकाश उत्सर्जित करणारे सजीवांबद्दल आमूलाग्र गोष्टी शोधल्या आहेत. प्रत्येक जीव हा खास प्रकारचा आणि तीव्रतेचा प्रकाश निर्माण करतात. नवळदीप नावाचा एक जीव जवळपास चोवीस प्रकारचा प्रकाश निर्माण करतो. हा प्रकाश ते जीव काही सूक्ष्म जीवांच्या मदतीने निर्माण करतात. या प्रकाशाच्या मदतीने हे मत्स जीव इतरांना प्रणय वा शिकारीसाठी आकर्षित करतात.
  समुद्री किनाऱ्यावर असलेली कांदळवन हि आणखी एक खास प्रकारची परीसंस्था जी समुद्रात असणाऱ्या कित्येक सजीवांच्या जीवनकाळात सुरवातीची पाळणाघरे म्हणून आपली भूमिका बजावतात. प्रजननासाठी उपयुक्त असा अधिवास हि कांदळवन बजावतात. भारतात 'भीतर्कनिक' येथील कांदळवन २००४ मधील त्सुनामी मध्ये रक्षक भिंतीची भूमिका बजावली. जगभरात समुद्री मासे हे मुख्य अन्न म्हणून लाखो लोकांना आधार देतात. सिल्व्हिया अर्ले सारख्या संशोधकांनी समुद्री अधिवास किती उपयुक्त आहेत हे समजवण्यासाठी स्वतःचा जीवन समर्पित केलं आहे. "No water no life, No blue no green"  ह्या एक वाक्यातच आपणस समुद्र किती महत्वाचं आहे हे आपणस समजून येईल.
  जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करून टाकावे अवघे जण या संत उक्ती प्रमाणे मला जे माहित आहे ते मी तुम्हला सांगतो. समुद्र विज्ञान पुस्तकात वाचणं आणि स्वतःहा समजून घेणे यात खुप फरक आहे. आज या समुद्री अधिवासाला जर आपणांस टिकवायचा असेल तर आपण काही सोप्या गोष्टी करू शकतो.
१). प्लास्टिक प्रदूषके  समुद्रात निदान स्वतःहून नाही टाकणे
२). कमीत कमी सुट्टी च्या वेळेत तरी वाहनांचा प्रवास टाळून पाई प्रवास करावा.
३). आपल्या जवळील समुद्री किनाऱ्यावर भेटी देऊन समुद्र निरीक्षण करणे आणि त्याच्या नोंदी करणे
४). जगभरात चालू असलेले समुद्र संशोधन विविध मासिके आणि युट्युब वरून समजून घेणे
                                                     
                                                      लेखन- प्रदिप नामदेव चोगले



टीप:- आपणा पैकी कोणाला काही समुद्री सजीवा बद्दल माहीत करून घ्याच असेल वा काही प्रश्न असतील तर नकीच  कमेंट मध्ये तुमचे प्रश्न वा काही नोंद असेल तर कळवा.

खाली काही लिंक दिल्या आहेत ज्या वर जाऊन आपण काही मजेशीर गोष्टी समजून घेऊ.
https://www.ted.com/talks/edith_widder_glowing_life_in_an_underwater_world?language=en

https://www.ted.com/talks/sylvia_earle_s_ted_prize_wish_to_protect_our_oceans?language=en





image from - 
https://www.theguardian.com/science/blog/2013/mar/08/seafarers-science-needs-you-oceans
https://i.pinimg.com/originals/40/17/d6/4017d6b1796832304db6a8ce62901432.jpg
https://www.popsci.com/article/science/UpAm1ztpzekSOAqR.32







Comments

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५