
कोंबडी आधी कि अंड आधी - कोडं जीवनिर्मितिचं शाळेत जायला लागल्या पासून एक कोडं आपल्याला नेहमीच विचारलं असेल "पहिलं काय आलं? कोंबडी कि अंडा?" आणि नेहमीच आपण या प्रश्नांची बरेच उत्तर ऐकली असतील. कोणी म्हणेल कि कोंबडी तर कोणी म्हणेल कि नाही अंड पाहिलं आला असेल. उत्तर काही असो त्या प्रत्येक उत्तराला पुन्हा तोच उलटा प्रश्न कि कोंबडी आधी अली असेल तर मग ती तर अंडयातून येते आणि जर अंड पाहिलं असेल तर ते अंड तर कोंबडी देते. बालपणी हा प्रश्न गंमतीचा असेल वा काही जणांसाठी हाच प्रश्न कुतूहलाचा असेल पण खरंच हा प्रश्न विज्ञानाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. तर सर्वंना नमस्कार, मी तुमचा दोस्त प्रदिप नामदेव चोगले पुन्हा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी आणखी एक नवीन लेख. मागील लेख आणि त्या लेखावर आधारित माझं युट्युब चॅनल वर आपण वाचलं असेल वा पाहिलं असेल की प्रसिद्ध पुस्तक 'लाईफ ऑन अर्थ' मधील पाहिलं प्रकरण ज्यात आपण जीवसृष्टीतील प्रचंड जीव विविधता आणि उत्क्रांती याची तोंडओळख करून घेतली या लेख मध्ये आपण एका मूलभूत प्रश्नाला समजून घेऊ तो म्हणजे ही विविधता ...