कोंबडी आधी कि अंड आधी - कोडं जीवनिर्मितिचं


शाळेत जायला लागल्या पासून एक कोडं आपल्याला नेहमीच विचारलं असेल "पहिलं काय आलं? कोंबडी कि अंडा?" आणि नेहमीच आपण या प्रश्नांची बरेच उत्तर ऐकली असतील. कोणी म्हणेल कि कोंबडी तर कोणी म्हणेल कि नाही अंड पाहिलं आला असेल. उत्तर काही असो त्या प्रत्येक उत्तराला पुन्हा तोच उलटा प्रश्न कि कोंबडी आधी अली असेल तर मग ती तर अंडयातून येते आणि जर अंड पाहिलं असेल तर ते अंड तर कोंबडी देते. बालपणी हा प्रश्न गंमतीचा असेल वा काही जणांसाठी हाच प्रश्न कुतूहलाचा असेल पण खरंच हा प्रश्न विज्ञानाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. 
  तर सर्वंना नमस्कार, मी तुमचा दोस्त प्रदिप नामदेव चोगले पुन्हा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी आणखी एक नवीन लेख. 
मागील लेख आणि त्या लेखावर आधारित माझं युट्युब चॅनल वर आपण वाचलं असेल वा पाहिलं असेल की प्रसिद्ध पुस्तक 'लाईफ ऑन अर्थ' मधील पाहिलं प्रकरण ज्यात आपण जीवसृष्टीतील प्रचंड जीव विविधता आणि उत्क्रांती याची तोंडओळख करून घेतली या लेख मध्ये आपण एका मूलभूत प्रश्नाला समजून घेऊ तो म्हणजे ही विविधता कशी सुरु झाली आणि कधी सुरु झाली. 
  तर गोष्ट आहे १९५० या वर्षातील ज्या वेळी थोर जीव शास्त्रण यूरी आणि मिलर या जोडगोळीने हे जग कसं निर्माण झालं याचा प्रयोग केला. फार पूर्वी म्हणजे साधारण ३००० दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वी वर ऑक्सिजन जवळपास अस्तित्वात नाही होतं सर्वत्र ज्वालामुखी उद्रेकातुन राखेचा उद्रेक होत होता आज आपण जी विविध खंड पाहतो ती अस्तित्वात आली नव्हती. वातावरणात फक्त मोठ्या प्रमाणात अमोनिया, हायड्रोजन आणि मिथेन यांचं मोठं प्रमाण होत. आकाशात खूप जास्त प्रमाणात विजा कडकडत होत्या. याचं धरतीवर जीवनाच्या उगमाला सुरवात झाली. साधारण जीवनाचा उगम आणि आज वर्तमान काळ याची कालमोजनी केली  तर ती खूप मोठी भरेल. पण चला समजून घेऊ कि हा काळ आपण जर फार्स्ट बॅकवर्ड करून समजून घेऊ. संपूर्ण सृष्टी वरील विविधतेचा क्रम आपण समजून घेण्यासाठी या मोठया कालावधी आपण एका वर्षात हे कसं घडलं असेल या बेताने पाहू. 
  हे पूर्ण वर्ष आहे साधारण ३००० दशलक्ष इतकं मोठं आणि त्यातील प्रत्येक दिवस आहे साधारण १० दशलक्ष इतका वेळेचा. या वर्षाच्या साधारण ऑगस्ट महिनात दुसरा आठवड्यात alge वा शैवाल  वा एकपेशीय शैवाल सदृश जीवाचं जन्म झाला. पण या पूर्वी साधारण जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत जे घडलं ते खूप जास्त महत्वाचं आहे. वतावरणात असलेलं अमोनिया आणि इतर घटक या पासून अमायोनो ऍसिड ची अचानक निर्मिती झाली या अमिनो आम्ला विविध प्रथिने अर्थात आपण ज्याला प्रोटीन असं म्हणतो त्यांची निर्मिती झाली यातून पुढे एक चमत्कारिक रसायन तयार झालं ते म्हणजे डि.एन.ए (DNA) जे इतर रसायनाबरोबर अभिक्रिया करू शकत होत. याची संरचना एकमेकांमध्ये गुंफले ली शिडी प्रमाणे असते ज्यात प्रत्येक बाजू वेगळी होऊन स्वतः प्रमाणे पूरक शिडी निर्माण करू शकते. आणि यातून पुढे मूलभूत प्रथिने निर्माण झाली ज्या मुळे जीवनिर्मिती साठी जणू सुरवात झाली. अचानक वा निसर्गातील काही गोष्टींमुळे या DNA रचनेत बिघाड होत असे आणि हा एक छोटासा बदल या पृथ्वीवरील नानाविधी सजीव सृष्टीचा पाईक ठरला.
  फार पूर्वी जे सूक्ष्मजीव वा जिवाणू निर्माण झाले ते वातावरणात असलेल्या उपलब्ध कार्बन युक्त गोष्टी वर जगत होते परंतु जशी जशी या जीवांची संख्या खूप जास्त होऊ लागली तशी यातून आणखी काही प्रश्न निर्मान झाले. जशी कि या उपलब्ध खाद्य आणि अधिवास यातून पुढे असे काही सूक्ष्म जीव निर्माण झाले जे वातावरणातील मोठ्या प्रमाणत कार्बन हे पाण्यातून कसं मिळवता येईल यासाठी प्रयत्नशील झाले यातून पुढे उदयाला आले ते म्हणजे नीळ हरित शैवाल वा blue-green algae जे पाण्यातील मिथेन चा वापर करण्याबरोबर त्यातील हायड्रोजन आणि ऑक्ससीजन वेगळे करू लागले आणि हळू हळू या पृथ्वीवर आज जसं ऑक्ससीजन आहे त्या पद्धतीची सुरवात झाली. 
निल-हरित शैवाळ हि या सृष्टीत ऑक्ससीजन पूरक वातावरण बनवण्यात महत्वाची ठरली. साधारण जीवनिर्मिती च्या वर्षात ऑगस्ट महिना मध्ये या गोष्टीला सुरवात झाली. हळू हळू जशी प्रकाश संश्लेषण आधारित जीवांची संख्या वाढू लागली पृथ्वीवरील वातावरण नवीन जीवनिर्मितीसाठी पोषक ठरू लागलं. पुढे पुढे यातून आणखी गुंतागुंतीची रचना असलेले जीव निर्माण होऊ लागले. 
  साधारण जस जस  काळ पुढे लोटू लागला सजीव निर्मिती आणि त्यातील विविधता आणखी वाढू लागली. आता ही गोष्ट उत्क्रांती आणि जीवनिर्मती शास्त्रणांना कशी समजली तर सदर सजीवांचे अवशेष सापडले त्यावरून. स्ट्रोमॅटोलाइत नावाची खडक सदृश रचना समुद्र किनारी आढळून येते स्ट्रोमॅटोलाइत दुसरं तिसरं काही नसून या प्राचीन अश्या नीळ-हरित शैवाल रचनेची मोठी वसाहत आहे. काही शैवाल या कालखंड मध्ये आपल्यातून लाईम वा चुनखडी स्त्रवित करत असें यातून अशी खडक सदृश रचना उदयाला अली. वातावरणात झालेला बदल समजून घेण्यासाठी हे रचना अभ्यासणे खूप गरजेचं ठरतं. आज भारत आणि इतर देशात अशी रचना आपणस दिसून येते. 
  जीवसृष्टी निर्मिती चं वर्षाचा जर आपण वेगवान आढावा घेण्याचा ठरवलं तर साधारण नोव्हेंबर महिनात दुसरया आठवड्यात जगातील पहिला कृमी सदृश प्राणी निर्माण झाले ज्यांचे अवशेष आज देखील आपणास ग्रँड कॅनियन च्या दगडी भिंती मध्ये सापडेल. याच महिन्याच्या एका आठवड्या नंतर जगातील पहिला मासा निर्माण झाला. डिसेंबर च्या १५ तारखेला पाली वा सरडा अश्या सारखे सरपरडणारे जीव निर्माण झाले. माणूस कधी आला असा प्रश्न जर तुम्हला पडला असेल तर माणूस वा आपण या भूतळावर आलो ते अगदी वर्षा अखेरी म्हणजे ३१ डिसेंबर च्या संध्याकाळी.
  ऑगस्ट मध्ये आलेल्या अगदी साधारण जिवाणू पासून आज जे गुंतागुंतीचे जीव निर्माण झाले आहेत त्याची सुरवात झाली साधारण १२०० दशलक्ष निर्माण झालेल्या काही एकपेशीय जीवांपासून. जिवाणू आणि प्राणी यात बऱ्याच अंशी फरक असतो , म्हणूनच आपण ज्याला खऱ्या अर्थाने प्राणी म्हणू असे सुरवातीचे प्राणी जे एकपेशीय होते ते आले या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात सुरवातीला. या सुरवातीच्या जीवना प्रोटिस्ट अशी वैज्ञानीक बिरुदावली ने संबोधले जाते. यालाच आदिजीव असं देखील दुसरं नामकरण आहे. आज जगभरात १०,००० पेक्षा जास्त प्रोटिस्ट वा आदिजीव यांच्या प्रजाती आढळून येतात. शाळेत आपण अमिबा ची ओळख केली असेल हा याच गटातील प्राणी. 
  एक पेशी प्राणी आणि आपल्या सारखे अनेक पेशीय प्राणी याचा कालानुक्रमे उदय होण्यासाठी जीवनिर्मितीच्या वर्षात सप्टेंबर ते डिसेंबर असं ४ महिने इतका मोठा काळ लागला. आज आपण जे नानाविधी प्राणी पाहतो याची सुरवात तेव्हा झाली जेव्हा एकपेशीय विविध सजीव एकत्र येऊन विविध कामे करू लागली. Volvax वोल्वेक्स नावाचं प्राणी हा या गोष्टीचा जिवंत उदाहरण होय. यात कित्येक आदिजीव आपल्या विविध अश्या सवयी प्रमाणे एकत्र येऊन राहू लागले. 
  परंतु आता पुन्हा येऊ आपल्या लेखाच्या मूळ शिर्षकाकडे ' कोंबडी आधी कि अंड आधी '. प्रजनन हि सजीवा प्राणी ज्यांना म्हटलं जातं त्या प्राण्यांची विशेषता आहे. सुरवातीला स्वतःच विभाजन करून जीव आपली संख्या वाढवत असत. पण पुढे या प्रक्रियेमध्ये काही विशिष्ट पेशी वा जीव समहु जो हालचाल करू शकतो आणि आणि दुसरा अस समूह जो याला पोषित करू शकतो अश्या गटामध्ये विभागणी झाली . आणि यातून पुढे या जीवनाच्या समूहा पासून अंडे(egg cell) आणि वीर्य (sparm cell ) अशी दोन ढोबळ प्रकारात विभागणी झाली. आणि पुढे उत्क्रांतीचं चक्र आणखी वेगाने फिरू लागलं. अंड आणि वीर्य यांच्या फलनातून पूढे आणखी सजग जीव निर्माण झाले. सुरवातीला फक्त विविध एक पेशीय जीव एकत्र येत आणि एक स्वतंत्र पेशी आणि त्याच बरोबर एक वसाहत करून राहू लागले. या टप्यातील महत्वाचं अंतर दर्शक दगडाप्रमाणे पाईक ठरलं एक प्राणी ज्याला आपण स्पॉंज असे म्हणतो. यात असंख्य एक पेशी एकत्र येतात आणि विशेष अशी कोणती गुंतागुंत न करता एक वसाहत निर्माण करतात. अंघोळी साठी वा पाणी साफ करण्यासाठी वा भांडी घसण्यासाठी आपण जो स्पंज वापरतो तसाच आहे हा प्राणी. 

      - लेखन
      - प्रदिप नामदेव चोगले
        pradipnc93@gmail.com/
        9029145177

 
 
 संदर्भ :-
Explain 1 chapter infinite variety from popular book Life on earth in marathi.
ओळख करून घेऊ एक मजेशीर प्रसिद्ध पुस्तक लाइफ ऑन अर्थ बद्दल. निसर्गातील सुंदर गोष्टी उलघडणार एक छान पुस्तक.  # ऐकू या आता माझ्या आवाजात # pradipnchogale #
3.
पुस्तक परीचय :-  LIFE ON EARTH
       A NATURAL HISTORY
लेखक - Sir David Attenborough
मूळ पुस्तकांची भाषा :- इंग्रजी
Marathi book introduction
  ' वाचू आनंदाने ऐकू आनंदाने '
:- प्रदिप नामदेव चोगले
Pradip n. Chogle

4. https://pin.it/tdujaokawr262h




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५