
जेव्हा पक्षी गाणं गाणे बंद करतात- १ दोस्तांनो आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे एक दन्त कथा. अहो दन्त कथा म्हणजे तुम्हाला माहित असेलच कि हि अशी गोष्ट असते जी एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे सांगितली जाते. परंतु आज मी जी तुम्हाला कथा सांगणार आहे ती खूप खास आहे कारण ही अशी दन्त कथा आहे जी अजून घडली नाही तर ती भविष्यातील कथा आहे. हि अशी गोष्ट आहे जी जरी मी एखाद्या जादूगाराप्रमाणे काही दशक आधीच सांगणार आहे. ही गोष्ट आहे तुम्हा सर्वांची माझी आणि आपल्या सर्वांची. एक खूप सुंदर गाव असतं, खूपच सुंदर निसर्ग वैभवाने नटलेलं जेथे सुंदर पक्षी रोज गाणी गात असतात खुप गोडं गाणी. वर्षभरात बदलणाऱ्या ऋतू प्रमाणे कधी वसंता च्या अगमना बरोबर तर कधी शिशीर च्या बदलणाऱ्या रंगांबरोबर. जिथे शुभ्र धवल निर्झर खळखळ वाहताना गावाला सुजलाम सुफलाम बनवत असतात. लहान मुलं जिथे सकाळी फुलपाखरं आणि बेडूक यांच्या तालात खेळ खेळतात आणि रात्री टीम-टीमणाऱ्या काजवांच्या प्रकाशात आजी आजोबा सोबत त्यागी वीर पुरुषांच्या गोष्टी ऐकत झोपी जातात. सुपीक काळी माती जेथे सर्वांचे पोषण करत असते. सर्वच कसं अगदी आनंदी आनंद असतो. परं...