जेव्हा पक्षी गाणं गाणे बंद करतात- १


दोस्तांनो आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे एक दन्त कथा. अहो दन्त कथा म्हणजे तुम्हाला माहित असेलच कि हि अशी गोष्ट असते जी एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे सांगितली जाते. परंतु आज मी जी तुम्हाला कथा सांगणार आहे ती खूप खास आहे कारण ही अशी दन्त कथा आहे जी अजून घडली नाही तर ती भविष्यातील कथा आहे. हि अशी गोष्ट आहे जी जरी मी एखाद्या जादूगाराप्रमाणे काही दशक आधीच सांगणार आहे. ही गोष्ट आहे तुम्हा सर्वांची माझी आणि आपल्या सर्वांची.
  एक खूप सुंदर गाव असतं, खूपच सुंदर निसर्ग वैभवाने नटलेलं जेथे सुंदर पक्षी रोज गाणी गात असतात खुप गोडं गाणी. वर्षभरात बदलणाऱ्या ऋतू प्रमाणे कधी वसंता च्या अगमना बरोबर तर कधी शिशीर च्या बदलणाऱ्या रंगांबरोबर. जिथे शुभ्र धवल निर्झर खळखळ वाहताना गावाला सुजलाम सुफलाम बनवत असतात. लहान मुलं जिथे सकाळी फुलपाखरं आणि बेडूक यांच्या तालात खेळ खेळतात आणि रात्री टीम-टीमणाऱ्या काजवांच्या प्रकाशात आजी आजोबा सोबत त्यागी वीर पुरुषांच्या गोष्टी ऐकत झोपी जातात. सुपीक काळी माती जेथे सर्वांचे पोषण करत असते. सर्वच कसं अगदी आनंदी आनंद असतो. परंतु एके दिवशी काय माहित सर्वच गोष्टी बदलायला लागतात.
  अचानक भरघोस पीक देणारी जमीन असं पीक पोटात वाढवायला लागते जे खाऊन कित्येक जण आजारी पडतात. पोषण देणार दूध आता अचानक कित्येक आजारांचं कारण ठरू लागतं. भात शेतात आणि खाचरात भिरभिरणारी फुलपाखरं अचानक गायब होऊन जातात. रात्री असंख्य काजवांच्या प्रकाशात न्हाऊन निघणार झाड आता आपली पान गाळून टाकत. म्हातारी माणसं आजारी पडून मरू लागतात पण त्याच बरोबर लहान चिमुकली बाळ काही आजार होऊन काही तासातच निघून जातात. काय होत आहे? कशामुळे होत आहे?  कशाने सर्व थांबणार? काहीच कळत नाही.
आणि एक दिवस असा उजाडतो कि उगवत्या सुर्याबरोबर किलबिलाट करत गाणारे पक्षी गाणं गाणे बंद करतात. संध्याकाळी जेव्हा हा सोन्याचा गोळा बुडायला लागतो तेव्हा घरट्यात परतणारी पाखरं पुन्हा येतच नाहीत.
  हि गोष्ट कुठल्या गावातली आहे असा जर प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर याच उत्तर आहे 'नाही' असं एक हि गाव नाही जेथे इतकी सर्व विनाशकारी गोष्ट घडली आहे. आणि माझी इच्छा वा तुमची देखील इच्छा नसेल की असं कुठे हि घडू नये. परंतु असंच नाही पण अश्या सारखं थोडं बहुत जेथे घडतं अशी कित्येक गाव आज अमेरिकेत वा जगाच्या कित्येक देशात आहेत. अगदी आपल्या भारत भूमीत देखील अशी गाव आहेत जेथे असंच थोडं बहुत घडत आहे. आणि मला माफ करा मी तुम्हाला घाबरवंत नाही परंतु ही दन्तकथा खरी होणं आता अगदी शक्य झालं आहे. एक दिवस असा येऊ शकतो तेव्हा पक्षी आपलं गोडं गाणं गाने बंद करतील.
  असं का घडेल वा असं काही काही ठिकाणी का घडलं आहे याचाच उत्तर या लेखाच्या पुढील भागात आपण वाचणार आहोत आणि माझ्या आवाजात ऐकणार आहोत.
                 -  लेखन
                 -  प्रदिप नामदेव चोगले
                 - pradipnc93@gmail.com
                 - mob no. 9029145177



टीप :- आपणांस हा लेख कसा वाटलं याची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून शकता. अधिक माहितीसाठी खाली दिलेले संदर्भ ग्रँथ आपण अभ्यासू शकता.



संदर्भ :-

  • ‌The Sea Around Us by Rachel Carson
  • ‌Silent Spring by Rachel Carson
  • ‌Under the Sea Wind: A Naturalist's Picture of Ocean Life (1941) by  Rachel Carson
  • ‌Always, Rachel: The Letters of Rachel Carson and Dorothy Freeman, 1952-1964 (Concord Library)
 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५