Posts

Showing posts from March, 2020
Image
जेव्हा पक्षी गाणं गाणे बंद करतात -२   या पृथ्वीवर जीवनाची उत्पत्ती कशी झाली आणि कधी झाली ही गोष्ट अतिशय रंजक, गुंतागुंतीची पण तितकीच उद्बोधक अशी आहे. कित्येक संशोधन पत्रिका आणि सिद्धांत या आधारावर आपण सांगू शकतो की साधारण ४.२ अब्ज वर्षा पूर्वी पृथ्वीची निर्मिती आणि जीव उत्क्रांती   पृथ्वीची निर्मिती झाली असावी, सुरवातीला एका तप्त वायूंचा गोळा अश्या अवस्थेतून हळू हळू थंड होत ती सघन होत गेली. लाखो वर्षांच्या प्रक्रियेनंतर आज आपण जी आपली पृथ्वी आज पाहतो ती झाली. आणि आज देखील आपणांस जाणवेल वा कधी- कधी जाणवणार नाही असे छोटे मोठे बदल येथे सतत घडतच आहेत. जीवरसायन विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बोलायचं म्हटलं तर आपण सांगू शकतो की आज जे काही या ग्रहावर आहे ते म्हणजे येथे असलेल्या काही रासायनिक आणि जैविक घटकांमधील घडत जाणारी अत्यंत हळुवार आणि गुंतागुंतीची प्रक्रियेचा परिपाक आहे. आज आपण ज्यांना सजीव असे म्हणतो वा ज्या गोष्टींना निर्जीव असे म्हणतो त्यात जर कोणता मूलभूत फरक असेल तर ते अर्थातच त्यात असलेल्या विविध मूलद्रवांच्या अणू मधील प्रकार आणि संख्येमधील फरक इतकंच असेल.    पक्षी ग