Posts

Showing posts from August, 2021

सागर कथा - भाग २

Image
  नारळी पौर्णिमा -  सागर पूजन ते  सागर  संवर्धन आज सकाळपासून शुभेच्छाचा वर्षाव सुरु झाला. मी एक मासेमारी समाजातील व्यक्ती आहे म्हणून माझ्या परिचयातील मंडळी आर्जवून मला 'नारळी पौर्णिमा' च्या उत्सवा निमित्त शुभ संदेश पाठवत होते. यातील एक सवांद मात्र मला जरा व्यथित करून गेला. कारण समोरली व्यक्ती फोनवर म्हणाली कि "नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आज तुमचा फार मोठा सण" मी उत्तरलो तुमचा? अहो हा सण केवळ माझा किंवा आमचा नव्हे तर या भूतळावर जगत असलेल्या समस्त मानवी सभ्यतेचा.     आपल्या येथे बहुसंख्य समाज धारणेत एक चुकीची विचार पद्धत फार प्रचुरतेने दिसून येते ती म्हणजे स्वतःला एका विशिष्ठ संकुचित विचार धारेत अडकून घेणे. समाजाला, देशालाच नव्हे तर ज्यांनी अखंड मानवी समाज रचनेला खूप काही अद्भुत असे विचार आणि प्रयोग दिले त्या 'विचारशील व्यक्ती ' ना आपण विशिष्ठ अश्या समाजासोबतच कायमचं बांधून टाकतो. त्याच बरोबरीने हजारो वर्षांपासून चालत आलेल्या रीती, परंपरा आणि कार्यप्रणाली यांना एक तर आपण त्या त्या धर्म, जात, समाज घटक आणि विशिष्ठ प्रदेशात स्थिरावलेल्या समाजा प