Posts

Showing posts from April, 2022

माझ्या कविता - निरागस कुतूहल

Image
प्रस्तावना : - मागील दोन वर्षांपासून भारतीय समुद्री क्षेत्रात सागरी सस्तन प्राणी आणि समुद्री कासवे यांच्या संशोधन मोहिमेमध्ये सहभागी होणे ही माझ्या साठी एक खूप मोठी उपलब्धी आहे. बालपणापासून समुद्र आणि मासेमारी हे तर रोजच्या जीवनाचा भाग आहे परंतु शास्त्रीय पद्धतीने सागर संशोधन करणाऱ्या चमू चा एक अविभाज्य भाग बनणे म्हणजे जे स्वप्न उराशी बाळगून आहे त्या दिशेने आगेचूक करण्यासारखे आहे. मित्रहो सदर कविता म्हणजे माझ्या मनांत बुद्धी आणि भावना याचा चाललेल्या नाटकाचा एक विनोदी प्रयोग आहे.   निसर्ग नेहमी आपल्या नानाविधी रूपाने मला मोहित करत असतो. संपूर्ण जगभरात १३५ सागरी सस्तन प्राणी प्रजाती आढळून येतात ज्यात अजस्त्र अश्या देवमासे आणि डॉल्फिन यांचा समावेश होतो. यातील २८ प्रजाती ह्या भारतीय सागरी क्षेत्रात दिसल्याची नोंद संशोधक मंडळी ने आपल्या येथे केली आहे. जगातील सगळ्यात विशाल असे नीले देवमासे आपल्या किनारी निश्चित रीत्या विहार करताना अकस्मित रीत्या मासेमारी करणाऱ्या मंडळी पाहतात.      खोल आणि मुख्य समुद्र किनाऱ्यापासून दूर जेव्हा आपण सागरात विहरत असतो तेव्हा अचानक आपल्या बोटी जवळून ज्या पक्षी प