माझ्या कविता - निरागस कुतूहल


प्रस्तावना : - मागील दोन वर्षांपासून भारतीय समुद्री क्षेत्रात सागरी सस्तन प्राणी आणि समुद्री कासवे यांच्या संशोधन मोहिमेमध्ये सहभागी होणे ही माझ्या साठी एक खूप मोठी उपलब्धी आहे. बालपणापासून समुद्र आणि मासेमारी हे तर रोजच्या जीवनाचा भाग आहे परंतु शास्त्रीय पद्धतीने सागर संशोधन करणाऱ्या चमू चा एक अविभाज्य भाग बनणे म्हणजे जे स्वप्न उराशी बाळगून आहे त्या दिशेने आगेचूक करण्यासारखे आहे. मित्रहो सदर कविता म्हणजे माझ्या मनांत बुद्धी आणि भावना याचा चाललेल्या नाटकाचा एक विनोदी प्रयोग आहे.

  निसर्ग नेहमी आपल्या नानाविधी रूपाने मला मोहित करत असतो. संपूर्ण जगभरात १३५ सागरी सस्तन प्राणी प्रजाती आढळून येतात ज्यात अजस्त्र अश्या देवमासे आणि डॉल्फिन यांचा समावेश होतो. यातील २८ प्रजाती ह्या भारतीय सागरी क्षेत्रात दिसल्याची नोंद संशोधक मंडळी ने आपल्या येथे केली आहे. जगातील सगळ्यात विशाल असे नीले देवमासे आपल्या किनारी निश्चित रीत्या विहार करताना अकस्मित रीत्या मासेमारी करणाऱ्या मंडळी पाहतात.   

  खोल आणि मुख्य समुद्र किनाऱ्यापासून दूर जेव्हा आपण सागरात विहरत असतो तेव्हा अचानक आपल्या बोटी जवळून ज्या पक्षी प्रजाती विहरत असतात त्या मध्ये ज्याचा आपण उल्लेख करू शकतो असा एक सागरी पक्षी प्रजाती वर्ग म्हणजे स्ट्रोम पेटरल यांचा. जगभरात या गटात जवळपास वीस प्रजाती दिसून येतात. अथांग दर्या, फेसाळलेल्या लाटा आणि अवखळ वेगाने प्रवाहित होणारे सागरी वारे यांच्या समवेत या पक्षी प्रजातीचे निरीक्षण करणे म्हणजे सुंदर पर्वणी असते. 

 सदर कविता ही मी काय पहिलं? या पेक्षा अधिक मी का पहिल? यांचा मागोवा घेणारी आहे. आपणास ही कविता आवडली तर नक्कीच खाली कमेन्ट मध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा.     

    




निरागस कुतूहल 


मी नाही विसरू शकत ती पौर्णिमेची रात्र 

ज्यावेळी समुद्राच्या लाटा माझ्या पायांना स्पर्शणून जात होत्या 

किनाऱ्यापासून दूर क्षितिजाजवळ बोट डोलत होती 

सतत वाढत जाणाऱ्या थंडी आणि वाऱ्याबरोबर  II १II 


दिवस काय आणि रात्र काय सारे काही मंतरलेले होते 

निळ्याशार समुद्रात आम्ही शोधत होतो ते अजस्त्र जीव 

व्हेल, डॉल्फिन यांच्या सोबतीला झेपावणारे ते स्ट्राम पेट्रल 

अव्ह्यातपणे माझ्या नजरेखालून जात होते हळुवार  II २II  


कोणे एके सकाळी नुकतीच मी दुर्बीण डोळयांना लावली 

आणि बा काय आश्यर्य ते या रत्नागराच्या पोटात 

उडाले ते पाण्याचे उत्तुंग कारंजे माझ्या नजरेसमोर 

निळ्या देवमाश्याच्या आगमनाची होती ती पोचपावती  II ३II  


सदहृदय, कुतूहल आणि चिकाटी असेल तुमच्या जवळ 

तर प्रकृती उलगडत जाते तीच सुंदर स्वरूप हळुवारपणे 

संशोधन करणाऱ्याकडे निश्चित विचारी दृढ बुद्धी असावी 

पण जर त्याला लहान बालकांची निरागसता लाभली 

तर सृष्टी बोलू लागते फक्त तिच्या लेकराशी  II ४II  

-कवी 

प्रदीप नामदेव चोगले 

१०/०१/२०२२

मरीन ड्राइव्ह, कोचीन  

Comments

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५