Posts

Showing posts from October, 2022

भारतीय समुद्री क्षेत्रात विचरण करणारे सागरी सस्तन प्राणी आणि आपण – भाग ३

Image
  किलर व्हेल (Orcinus orca )   महासागरात विचरण करणारे सागरी सस्तन प्राणी या विलक्षण, आकर्षक आणि सागरी परिसंस्थेच्या बाजूने महत्वपूर्ण असलेल्या प्रणी गटाचा आपण अभ्यास करायला सुरवात केली आहे. आज आपण ज्या सागरी सस्तन प्राणी प्रजाती ला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याला ‘किलर व्हेल’ किंवा Orcinus orca ‘ओरॉसीनस ओरका’ या शास्त्रीय नावाने संबोधले जाते. जरी या प्राण्याला आपण व्हेल असं संबोधन लावले असले तरी देवमासे ज्या कुळात मोडतात अश्यात यांचा समावेश होत नाही तर डेल्फीनीडे वा सोप्या शब्दात बोलायचं तर डॉल्फिन या कुळात (Family) यांचा समावेश होतो. म्हणजेच नाव जरी किलर व्हेल असंल तरी ही डॉल्फिन प्रजाती आहे. संपूर्ण डॉल्फिन कुळात आकाराने सगळ्यात मोठ्या आकाराचे डॉल्फिन म्हणून आपण यांना लक्षात ठेऊ शकतो.    वरच्या बाजूला गडद काळा आणि पोटाच्या बाजूला शुभ्र पांढरा रंग, आकाराने त्रिकोणी आणि नजरेत भरतील असे मोठे वरचे पंख ही या प्रजाती ची ओलखण्यास सोपी अशी आकर्षक शरीर रचना आणि रंगसंगती. बहुधा बऱ्याच विज्ञान प्रबोधन पूरक चित्रपटात किंवा कार्टून फिल्म मध्ये आपण यांना नक्कीच पहिल असेल. वर उल्लेख केलेल