भारतीय समुद्री क्षेत्रात विचरण करणारे सागरी सस्तन प्राणी आणि आपण – भाग ३

 किलर व्हेल (Orcinus orca )




  महासागरात विचरण करणारे सागरी सस्तन प्राणी या विलक्षण, आकर्षक आणि सागरी परिसंस्थेच्या बाजूने महत्वपूर्ण असलेल्या प्रणी गटाचा आपण अभ्यास करायला सुरवात केली आहे. आज आपण ज्या सागरी सस्तन प्राणी प्रजाती ला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याला ‘किलर व्हेल’ किंवा Orcinus orca ‘ओरॉसीनस ओरका’ या शास्त्रीय नावाने संबोधले जाते. जरी या प्राण्याला आपण व्हेल असं संबोधन लावले असले तरी देवमासे ज्या कुळात मोडतात अश्यात यांचा समावेश होत नाही तर डेल्फीनीडे वा सोप्या शब्दात बोलायचं तर डॉल्फिन या कुळात (Family) यांचा समावेश होतो. म्हणजेच नाव जरी किलर व्हेल असंल तरी ही डॉल्फिन प्रजाती आहे. संपूर्ण डॉल्फिन कुळात आकाराने सगळ्यात मोठ्या आकाराचे डॉल्फिन म्हणून आपण यांना लक्षात ठेऊ शकतो. 

  वरच्या बाजूला गडद काळा आणि पोटाच्या बाजूला शुभ्र पांढरा रंग, आकाराने त्रिकोणी आणि नजरेत भरतील असे मोठे वरचे पंख ही या प्रजाती ची ओलखण्यास सोपी अशी आकर्षक शरीर रचना आणि रंगसंगती. बहुधा बऱ्याच विज्ञान प्रबोधन पूरक चित्रपटात किंवा कार्टून फिल्म मध्ये आपण यांना नक्कीच पहिल असेल. वर उल्लेख केलेल्या बाबी जरी एक सोपी अशी या प्राण्याची खूणगाठ असली तरी विशिष्ठ सागरी अधिवास, पाण्याची खोली, उपलब्ध अन्न, हिमनग आणि सागरी बेटे या आणि आणखी अश्या कित्येक बाबी आहेत ज्या गोष्टी मुले या प्रजाती मध्ये स्थान आणि काल अनुरूप बरेच आकार आणि रंगभेद दिसून येतात. आजपर्यन्त Orcinus orca ‘ओरॉसीनस ओरका’ या एकाच नावाने ही किलर व्हेल प्रजाती उल्लेखित केली गेली असली तरी काही फरक पाहता याचे जवळपास दहा विविध प्रकार आहेत असे संशोधनात सिद्ध झाले आहेत. 

१)रेसिडेंट किलर व्हेल: - मध्यम आकाराची, १-५० च्या समूहाने विचरण करणारी व्हेल. घोड्याला पाठीवर जसे आपण बसण्यासाठी खोगीर बसवतो अगदी तशीच काहीशी आकाराची आणि गडद काळया रंगाची रचना आपण या प्रकारात या व्हेल च्या मोठ्या पंख असतो त्याच्या मागे आणि खाली पाहू शकतो. आकाराने मोठे रावस मासे आणि इतर मोठे मासे हे यांच प्रमुख खाद्य आहे.   

२) बिगस किलर व्हेल: - रेसिडेंट किलर व्हेलच्या आकारा सोबत आपण जर यांची तुलना केली तर नक्कीच बिगस किलर व्हेल या त्याच्या या नावाप्रमाणे आकारणे मोठ्या असतात. नुकताच जन्मलेल्या शिशु किलर व्हेल २- २.६ मीटर इतक्या लांब असतात ज्याचं वजन सुरवातीला १६५-१८० किलो इतकं असतं. पूर्ण वाढ झालेले व्हेल नर आणि मादी यांच वजन अनुक्रमे १०,००० ते ७००० किलो इतकं असतं. तर प्रोढ नर-मादी यांची पूर्ण वाढ झाल्यावर लांबी अनुक्रमे ८.५ ते ९.८ मीटर इतकी असू शकते. आपल्या नावाला साजेसे बिगस किलर व्हेल या खऱ्या अर्थाने आपल किलर व्हेल हे नाव सार्थकी करतात. कारण या प्रकारच्या व्हेल चं मुख्य अन्न म्हणजे इतर सागरी सस्तन प्राणी जसे की व्हेल आणि डॉल्फिन असतं. या प्रकारच्या किलर व्हेल ची वरचा मुख्य पर   (dorsal fin) मोठे आणि टोकेदार असतात.   

३)ऑफशोर किलर व्हेल: - समुद्री किनारी आपण जर गेला तर जेथे किनाऱ्या लगत सुरू झालेला समुद्री पाण्याचा खोली हळूहळू वाढत जाते आणि अचानक ती खोल होत जाते जसे आपण समुद्रात आणखी आत जाऊ तसे . समुद्राच्या या अंतर्गत जळमग्न भुभागाला खंडात मंच (continental shelf) किंवा सागरी मंच असे म्हणतात. या भागात असलेल्या उथळ सागरी क्षेत्रात मुबलक प्रमाणात अन्न साठा असतो. पुढे आणखी समुद्रात आत गेल्यावर समुद्राची खोली तीव्रतेने वाढत जाते ज्या प्रदेशाला खंडात उतार (Continental Slope) असे म्हणतात. जेथे अधिक खोलीचा भाग सुरू होतो त्यास समुद्र विज्ञान च्या भाषेत ऑफशोओर असे विशेष नाव आहे. 

  आता आपल्या लक्षात आले असेल की ज्या भागाबद्दल आपण आता समजून घेतले त्या भागात ह्या ऑफशोर किलर व्हेल विचरण करतात. आकाराने वर आधी उल्लेख केलेल्या किलर व्हेल च्या तुलनेने ह्या व्हेल आकारणे थोड्या छोट्या असतात. जवळपास ५०-१०० च्या समूहामध्ये या विचरण करत असतात.        

४)टाइप १ किलर व्हेल: - या आकाराने लहान असतात. काळा-पांढरा रंग आणि डोळ्यावर असलेला समांतर पांढर टिपका ही याची विशेष अशी ओळख. दवाक आणि बांगडे चे थवे जेव्हा समुद्रात दिसून येतात तेव्हा त्याचा मागोवा घेत हे व्हेल त्याची शिकार करतात.   

५)टाइप २ किलर व्हेल: - जवळपास टाइप १ सारखे परंतु यांच्या डोळ्यावर असलेला पांढरा टिपका काहीसा थोडा खाली झुकलेला असतो. ह्या प्रकरचे व्हेल हे संपूर्णता इतर सस्तन प्राणी खाऊन आपली उपजीविका निभावतात.   

६)टाइप अ किलर व्हेल: -  आंटारटीक सरख्या अतिशय थंड प्रदेश ही याची प्रमुख निवासस्थाने आहेत. आकारणे सगळ्यात लांब म्हणजे जवळपास ९ मीटर पर्यन्त याची लांबी असते. द्रुविय प्रदेशात हे प्रमुखतेने हे दिसून येतात. 

७)टाइप ब मोठी किलर व्हेल: - या प्रकारचे किलर व्हेल आकाराने जवळपास ९ मीटर इतक्या लांब असतात. या देखील द्रुविय भागात मुख्यतो विचरण करतात. थंड प्रदेशातून थोड्या उबदार सागरी अधिवासात या प्रकरचे व्हेल मुख्यता विचरण करतात. सील हे यांचे प्रमुख खाद्य आहे.  

८) टाइप ब छोटी किलर व्हेल: - कळ्या-पांढऱ्या रांगा व्यतिरिक्त पांढऱ्या-राखाडी रंग यान मध्ये दिसून येतो. आकाराने टाइप ब मोठ्या किलर व्हेल च्या तुलनेने ह्या लहान असतात. 

९) टाइप क किलर व्हेल: - आकाराने लहान (५.२-५.६मीटर). मुख्यतो अंटारटीक खंडाच्या पूर्व भागात या विचरण करतात. दर वर्षाला उष्ण-थंड सागरी अधिवासात या विचरण करतात.   

१०) टाइप ड किलर व्हेल: - डोळ्यावर असलेल्या छोटा पांढरा टिपका ही या किलर व्हेल प्रकारची विशेष ओळख. अजून या प्रजाती बद्दल अजून बऱ्याच गोष्टी अज्ञात आहेत.   

  जवळपास दहा विविध प्रकारच्या किलर व्हेल त्याच्या ठराविक अश्या सागरी अधिवासात विचरण करत असल्या तरीही किलर व्हेल सागरी सस्तन प्राणी प्रजाती जवळपास जगभरात सर्वत्र दिसून येत असल्याची नोंद करण्यात आली आहे. अगदी खोल समुद्र, उथळ किनारी प्रदेश, खाडी मुख, बर्फाळ समुद्र आणि हिमनग असलेला अति थंड समुद्र अश्या सर्वच ठिकाणी या प्रजाती विचरण करतात. जवळपास गेल्या चार दशकाहून अधिक काळ किलर व्हेल मनोरंजन, संशोधन आणि मासेमारी या उद्देशा ला धरून अभ्यासल्या गेल्या आहेत. समुद्रात विचरण करणारे इतर सागरी सस्तन प्राणी, समुद्री कासवे आणि इतर मत्स्य प्रकार त्याच बरोबर पेंगविण सारखे समुद्री पक्षी असे विविध प्रकारच्या जीवांचा किलर व्हेल च्या खाद्यात समावेश होतो. १९०० शतकाच्या पूर्वार्था पर्यंत वर्षाला सरासरी ५६ किलर व्हेल विविध उद्देशाल धरून ठार करण्यात आल्या असा एक अंदाज आहे. त्या नतर च्या काळात मात्र संवर्धन आणि संशोधन यामुळे या हानिकारक गोष्टी वर मर्यादा आली. सरासरी ३०-९० वर्ष इतक्या वर्ष या प्रजाती जगतात असे दिसून आलं आहे. सागरी सस्तन प्राणी संरक्षण कायदा (MMPA) अंतर्गत जगभरात तर वन्य जीव संरक्षण कायदा (Wild Life (Protection) Act, 1972) अंतर्गत या प्रजाती ला भारतात संरक्षण देण्यात आलं आहे. जगभरात आत निव्वळ ५०,००० इतक्याच किलर व्हेल असतील असा अंदाज NOAA या संस्थेद्वारा नोंदवला गेला आहे. 

  समुद्रात कधी जाणीवपूर्वक तर कधी चुकून फेकलेल समुद्री जाले आणि आणि या जाळ्याचे तुटलेले मोठे तुकडे, समुद्री प्रदूषण, अति जास्त मासेमारी ई. बाबी किलर व्हेल प्रजाती ला मारक ठरत आहेत. 

  आपण या प्रजाती च्या संरक्षणा साठी काय करू शकतो तर: - 

१. मासेमारी करताना जर किलर व्हेल कींव इतर कोणता ही सागरी सस्तन प्राणी दिसला तर आपली बोट आणि या व्हेल मध्ये मुबलक अंतर ठेवा. 

२. बोटीचा वेग कमी करा किंवा लागलीच बोट बंद करून थोडा वेळ या प्राण्याना दूर जाऊ द्या. 

३. किलर व्हेल ची माहिती आपल्या जवळच्या सागरी संवर्धन केंद्र अधिकाऱ्या पर्यंत पोहचवा. 

४. मृत अथवा जखमी किलर व्हेल दिसल्यास लगेच सागरी पोलिस आणि वन अधिकारी यांना सूचित करावे. 

५. आपण अश्या बाबत ची माहिती मला ९०२९१४५१७७ या फोन क्रमांक किंवा pradipnc93@gamil.com ईमेल वर कळवू शकता. 

६. लक्षात घ्या सागरी सस्तन प्राणी आणि त्याचे अधिवास आपण जर आधिक चांगल्या पद्धतीने समजून घेतले तर मासेमारी, सागरी अधिवास यांना उत्तम पद्धतीने संवर्धित करू शकतो. 


टीप: - आपली प्रतिक्रिया खाली कमेन्ट मध्ये नक्की नोंदवा. हा लेख आणि माझा प्रयत्न आवडल्यास आपण याची लिंक आपल्या मित्र-परिवार सोबत वितरित करा. 



लेखन

प्रदिप नामदेव चोगले 

मोबाईल: - 9029145177

pradipnc93@gamil.com

दि 07/10/2022 



अधिक माहितीसाठी संदर्भ: - 
१. https://www.fisheries.noaa.gov/species/killer-whale
२. Vivekanandan, E., & Jeyabaskaran, R. (2012). Marine mammal species of India. Central Marine Fisheries Research Institute.
३. Jefferson, T. A., Webber, M. A., & Pitman, R. (2011). Marine mammals of the world: a comprehensive guide to their identification. Elsevier.  
४. Ridgway, S. H., Harrison, R., & Harrison, R. J. (Eds.). (1998). Handbook of marine mammals: the second book of dolphins and the porpoises. Elsevier.
५. Ratheesh Kumar, R., Rahul, R., Kuberan, G., Chogale, P. N., & Vivekanandan, E. (2022). Taxonomy of Marine Mammals.

 संदर्भ चित्र: - https://media.fisheries.noaa.gov/styles/original/s3/dam-migration/640x427-killer-whale.png?itok=mpHhEa6Y



Comments

  1. Khup chan...👌👌?काळाची गरज आहे खास मच्छिमार साठी

    ReplyDelete
  2. खूप अभ्यासपूर्ण लेख

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५