Posts

Showing posts from November, 2022

मैत्री समुद्री पक्ष्यांची

Image
  भारतीय समुद्री क्षेत्रात आकाश गमन करणारे स्थानिक आणि स्थंलांतरित समुद्री पक्षी या बाबत संशोधन करण्याचे प्रयत्न आज देखील प्राथमिक टप्प्यात आहे. त्याच बरोबर हवामान बद्दल, समुद्री प्रदूषण, अनियंत्रित मासेमारी आणि इतर असंख्य बाबी या सागरी पक्षी विविधता आणि आधिवासा यांना नवीन आव्हाने देत आहे. समुद्री पक्षाची हि भिरभिर  वैज्ञानिक संज्ञेसह सोप्या शब्दात या कवितेच्या माध्यमातून.    मैत्री समुद्री पक्ष्यांची  कधी किनारी, कधी सागरी भिर भिर त्याची न्यारी  समुद्र पक्षी विहार करतो तुफानी दर्या लाटांना चिरुनी II १ II  आकाशा सोबत नाते त्याचे दर्या सागराशी दोस्ती जाल, वल्ही आणि बोटी गाती त्याची प्रीत गाणी II २ II  खाडी किनारी संचित झालेला चिखल-गाळ, की असो कांदळवन वाळूचे असो किनारे की कालव-शिवल्याचे खडकाळ किनारे II ३II  मुबलक दाना-पाणी आणि विणीची वस्ती स्थाने ठरतात या समुद्री पक्षी मित्राचे कधी हंगामी मुक्कामे II ४II  लाटचिरा, वादळी टीवळा आणि मोहक लाल चोच असलेली समुद्र परी ही आहे काही खास भारतीय समुद्री पक्ष्याची मांदियाळी II ५II  सोसाट्याचा वारा सोबत सागरी लाटांचा सदैव मारा आव्हानात्महक बनवत असतो सा