मैत्री समुद्री पक्ष्यांची

 

भारतीय समुद्री क्षेत्रात आकाश गमन करणारे स्थानिक आणि स्थंलांतरित समुद्री पक्षी या बाबत संशोधन करण्याचे प्रयत्न आज देखील प्राथमिक टप्प्यात आहे. त्याच बरोबर हवामान बद्दल, समुद्री प्रदूषण, अनियंत्रित मासेमारी आणि इतर असंख्य बाबी या सागरी पक्षी विविधता आणि आधिवासा यांना नवीन आव्हाने देत आहे. समुद्री पक्षाची हि भिरभिर  वैज्ञानिक संज्ञेसह सोप्या शब्दात या कवितेच्या माध्यमातून. 





 

मैत्री समुद्री पक्ष्यांची 


कधी किनारी, कधी सागरी भिर भिर त्याची न्यारी 

समुद्र पक्षी विहार करतो तुफानी दर्या लाटांना चिरुनी II १ II 


आकाशा सोबत नाते त्याचे दर्या सागराशी दोस्ती

जाल, वल्ही आणि बोटी गाती त्याची प्रीत गाणी II २ II 


खाडी किनारी संचित झालेला चिखल-गाळ, की असो कांदळवन

वाळूचे असो किनारे की कालव-शिवल्याचे खडकाळ किनारे II ३II 


मुबलक दाना-पाणी आणि विणीची वस्ती स्थाने

ठरतात या समुद्री पक्षी मित्राचे कधी हंगामी मुक्कामे II ४II 


लाटचिरा, वादळी टीवळा आणि मोहक लाल चोच असलेली समुद्र परी

ही आहे काही खास भारतीय समुद्री पक्ष्याची मांदियाळी II ५II 


सोसाट्याचा वारा सोबत सागरी लाटांचा सदैव मारा

आव्हानात्महक बनवत असतो सागरी संशोधना च्या वाऱ्या II ६II 


वाढत जाणारे तापमान, वितळणारे हिमनग सोबत प्रदूषणाचा भार

वेगाने बदलवत आहे सारं चित्र आता या समुद्री विहंगाचे II७II 



समुद्री जाळ्यात अडकणे असो की असो खनिज तेलाचा पंखावर साचलेला थर

अवघडत बनवत आहे आता त्याचं जीवन दर्या सागरास जे अनुकूल II ८II 


थोडंस कुतूहल आणि थोडी संवेदना बदलू शकते हे चित्र

धरली कास आपण या वृत्तीची तर बनवतील सागर पक्षी आपले मित्र II ९II 


   -कवी

   -प्रदिप नामदेव चोगले

   १२.४५  दुपार

   (कल्याण- मुबंई लोकल प्रवास)

   २६ नोव्हेंबर २०२२

संदर्भ : - 
  • Grimmett, R., Inskipp, C., & Inskipp, T. (2016). Birds of the Indian Subcontinent: India, Pakistan, Sri Lanka, Nepal, Bhutan, Bangladesh and the Maldives. Bloomsbury Publishing.
  • Anderson, O. R., Small, C. J., Croxall, J. P., Dunn, E. K., Sullivan, B. J., Yates, O., & Black, A. (2011). Global seabird bycatch in longline fisheries. Endangered Species Research, 14(2), 91-106.
  • Lewison, R. L., & Crowder, L. B. (2003). Estimating fishery bycatch and effects on a vulnerable seabird population. Ecological Applications, 13(3), 743-753.
  • Stempniewicz, L., Błachowiak-Samołyk, K., & Węsławski, J. M. (2007). Impact of climate change on zooplankton communities, seabird populations and arctic terrestrial ecosystem—a scenario. Deep Sea Research Part II: Topical Studies in Oceanography, 54(23-26), 2934-2945.
  • Heubeck, M., Camphuysen, K. C., Bao, R., Humple, D., Rey, A. S., Cadiou, B., ... & Thomas, T. (2003). Assessing the impact of major oil spills on seabird populations. Marine pollution bulletin, 46(7), 900-902.
शब्दकोष: - 
  • लाटचिरा: - Shearwater
  • वादळी टीवळा: - Strom-petrel
  • लाल चोच समुद्र परी : - Red-billed Tropicbird
टिप: - 
 सदर कविता आपणांस आवडली  तर आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा. 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५