प्रवास चिंतन

जेव्हा नदी सागराला गोष्ट सांगते गेल्या काही दिवसांपासून बराच प्रवास झाला. नवीन गोष्टी, नवीन व्यक्ती, नवीन ठिकाण सोबत जेथे गेलो तेथली बोलीभाषा आणि पारंपरिक व्यवसाय अनुभवले. जवळपास १३०५ किमी अंतर गाडीने पार केलं तर ५० किमी पेक्षा अधिक अंतर पाई चाललो. यादरम्यान ३२ हून अधिक पक्षी प्रजातीची नोंद करता आली याचा मला कमालीचा आनंद झाला. ताम्रपर्णी आणि कुंडलीका या नद्यांच्या काठी वसलेली गाव आणि खेडी पहिली. जीवनात सुंगध भरेल असे हे सारं काही. या सगळ्या अनुभवाचं चिंतन केल्यानंतर काही प्रश्न मात्र फार बोलके पडले आहेत मला. कोल्हापूर, सातारा असे भेट दिलेल्या जिल्ह्यात सुपीक मृदा आणि सधन जिवविविधता दिसली मात्र शेती आणि संबंधी व्यवसाय मात्र एका भयावह संकटात आहे. हे संकट म्हणजे हा पारंपरिक व्यवसाय येत्या ५०-७० वर्षा नंतर येणारी शेतकरी पिढी चालू ठेवेल कि नाही? हीच बाब लागू पडते मासेमारी करणाऱ्या पुढील पिढी च्या बाबतीत. आजची माझी नोंद आहे मुरुड, अलिबाग, पेन, पनवेल, मुंबई शहर आणि उपनगरे या सर्व जिल्हात मासेमारी करण्या बाबत तरुण पिढी फारशी उत्साहात दिसत नाही. मासेमारी आणि शेती...