प्रवास चिंतन

 जेव्हा नदी सागराला गोष्ट सांगते





   गेल्या काही दिवसांपासून बराच प्रवास झाला. नवीन गोष्टी, नवीन व्यक्ती, नवीन ठिकाण सोबत जेथे गेलो तेथली बोलीभाषा आणि पारंपरिक व्यवसाय अनुभवले. जवळपास १३०५ किमी अंतर गाडीने पार केलं तर ५० किमी पेक्षा अधिक अंतर पाई चाललो. यादरम्यान ३२ हून अधिक पक्षी प्रजातीची नोंद करता आली याचा मला कमालीचा आनंद झाला. ताम्रपर्णी आणि कुंडलीका या नद्यांच्या काठी वसलेली गाव आणि खेडी पहिली. जीवनात सुंगध भरेल असे हे सारं काही. 

  या सगळ्या अनुभवाचं चिंतन केल्यानंतर काही प्रश्न मात्र फार बोलके पडले आहेत मला. कोल्हापूर, सातारा असे भेट दिलेल्या जिल्ह्यात सुपीक मृदा आणि सधन जिवविविधता दिसली मात्र शेती आणि संबंधी व्यवसाय मात्र एका भयावह संकटात आहे. हे संकट म्हणजे हा पारंपरिक व्यवसाय येत्या ५०-७० वर्षा नंतर येणारी शेतकरी पिढी चालू ठेवेल कि नाही? हीच बाब लागू पडते मासेमारी करणाऱ्या पुढील पिढी च्या बाबतीत. आजची माझी नोंद आहे मुरुड, अलिबाग, पेन, पनवेल, मुंबई शहर आणि उपनगरे या सर्व जिल्हात मासेमारी करण्या बाबत तरुण पिढी फारशी उत्साहात दिसत नाही. मासेमारी आणि शेती हे असे व्यवसाय आहेत ज्या बाबत यातील बारकावे हे एका पिढी कडून दुसया पिढी कडे हस्तातरीत होतात. पण जर माझे तरुण मित्र या बाबत इतके हाताश असतील ही नक्कीच धोक्याची घन्टा आहे.

  चंदगड तालुक्यात भ्रमती करताना जी गोष्ट मला खास भावली ती म्हणजे येथला पाहुणचार  आणि 'चंदगडी' भाषा. परंतु काळजी याची वाटते कि सध्या इकडचे तरुण आधुनिक शिक्षण आणि जागतिकरण याच्या खोट्या ईभ्रती साठी या बोलीभाषेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. इंजिनियरींग आणि मेडिकल सारख्या उत्तम शिक्षण घेतलेली पिढी कुढेतरी नोकरीनिमित्त गावा बाहेर स्थाईक होतात आणि नकळत या साऱ्या शुल्लक वाटणाऱ्या पण भाषा नष्ट ज्यां बाबी मुळे होते अश्या परिस्थितीची निर्मिती करत आहेत. डोक्यावरचा केशरी फेटा, ढोपऱ्या पर्यंत रेलणारी हाफ पॅन्ट हा पुरुषी पेहराव मला फारच भावला. त्याच बरोबर डोक्यावर पदर घेऊन अंजरी जरीची साडी हा स्त्रियांचा पेहराव देखील विशेष उल्लेखनीय आहे. झनझनीत तिखट पण तितकंच रुचकर जेवण ही या भागाची विशेष बाब आहे. नदीकिनारी वसलेली सुगरनीची घरटी या प्रदेशातील निसर्ग किती सुपीक आहे यांच सूचक आहे.

 या दरम्यान समुद्री किनारी तुलनेने जरा कमी वेळ देता आला. निसर्ग चक्रीवादळाचं संकट नुकताच कुठे दूर गेलं होत आणि यंदा आलं बिबपरजॉय या चक्रीवादळाचा धोका. शासकीय नियमानुसार यांत्रिक मासेमारी सध्या महाराष्ट्रात जुलै महिन्या अखेर पर्यंत बंद आहे. जी बिगर यांत्रिक  मासेमारी मासेमारी करून मच्छिमार आपलं पोट भरत होते ते देखील यांमुळे संकटात आहे.

  तूर्तास येथेच थांबतो पुढील बाबी या लेखाच्या पुढील पर्वात नक्की वाचा. आपणास हा लेख आवडल्यास आपली प्रतिक्रिया नक्कीच नोंदवा.


लेखन

- सागरपुत्र

(प्रदिप नामदेव चोगले)

कुलाबा मुंबई

दिनांक 18 जून 2023

09.02 रात्री 

Comments

  1. Khup chan....Satya paristiti aahe kaltarani sheti,mastya vevsay nasta hotil.....vichar karnyachi kalachi khup garaj aahe.....Paradip khup shubhechyya 50 Km payi pravas kelas....punha ekda धन्यवाद

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५