Posts

Showing posts from July, 2023

गोष्ट तिच्या अस्मितेची

Image
  'ती' ला समजून घेताना      माहीत नाही किती वेळ झाला असेल कि 'ती' माझ्या साठी धडपड करत असते. ती रोज सकाळी माझ्या साठी आणि कळत नकळत ज्यांना मी माझं म्हणतो त्या सर्वांसाठी भल्या पहाटे उठते. कधी काही खाऊन कधी उपाशीपोटी घराचा उंबरा ती ओलांडून घरा बाहेर पडते. ती हे सगळं काही सातत्याने आणि जिद्धीने करत असते यांचा अर्थ असा नाही कि तिला भीती वाटत नाही किंवा ती थकत नाही. तिला थोडी भीती असते, बहुधा ती थकते देखील पण तरी देखील ती हे सगळं करत असते. तिने माझ्या पेक्षा अधिक मेहनत करून (तब्बल दोन वर्ष दिवसाला 10-12 तास अभ्यास केला ) वर्ष 2017 मध्ये भारतातून कोणत्या ही जातीत जन्मलो म्हणून आरक्षण न घेता 50 वा क्रमांक पटकवलं. गेल्या चार वर्षात तिने निव्व्ळ माझ्या प्रेमा आणि सोबती साठी स्वतःचं करियर मध्ये ब्रेक घेतला.    सध्या तिची फार चिडचिड होते, ती बरीच दमते, तिला जे खायला आवडते असं खान पण ती कधी तरीच खाते. कधी घरातले कधी बाहेरचे तिला प्रोत्साहित करतात तर कधी तिला दुषण लावतात. पण माझ्या सगळ्या मित्रानो (विशेषतः ज्यांना आपण 'पुरुष' आहोत अश्या विशेष अहंकार असणाऱ्या मंडळी) हो ती हे