गोष्ट तिच्या अस्मितेची

 'ती' ला समजून घेताना 





   माहीत नाही किती वेळ झाला असेल कि 'ती' माझ्या साठी धडपड करत असते. ती रोज सकाळी माझ्या साठी आणि कळत नकळत ज्यांना मी माझं म्हणतो त्या सर्वांसाठी भल्या पहाटे उठते. कधी काही खाऊन कधी उपाशीपोटी घराचा उंबरा ती ओलांडून घरा बाहेर पडते. ती हे सगळं काही सातत्याने आणि जिद्धीने करत असते यांचा अर्थ असा नाही कि तिला भीती वाटत नाही किंवा ती थकत नाही. तिला थोडी भीती असते, बहुधा ती थकते देखील पण तरी देखील ती हे सगळं करत असते. तिने माझ्या पेक्षा अधिक मेहनत करून (तब्बल दोन वर्ष दिवसाला 10-12 तास अभ्यास केला ) वर्ष 2017 मध्ये भारतातून कोणत्या ही जातीत जन्मलो म्हणून आरक्षण न घेता 50 वा क्रमांक पटकवलं. गेल्या चार वर्षात तिने निव्व्ळ माझ्या प्रेमा आणि सोबती साठी स्वतःचं करियर मध्ये ब्रेक घेतला. 

  सध्या तिची फार चिडचिड होते, ती बरीच दमते, तिला जे खायला आवडते असं खान पण ती कधी तरीच खाते. कधी घरातले कधी बाहेरचे तिला प्रोत्साहित करतात तर कधी तिला दुषण लावतात. पण माझ्या सगळ्या मित्रानो (विशेषतः ज्यांना आपण 'पुरुष' आहोत अश्या विशेष अहंकार असणाऱ्या मंडळी) हो ती हे सगळं का करते हे मला आता थोडंस आकलन होऊ लागलं आहे. विशेषतः जेव्हा 'ती' तिच्या कामावर जाते आणि मोठ्या तन्मयतेने स्वतःचं उत्तम योगदान देऊन रोज काम करते तेव्हा तिला सगळ्यात जास्त आनंद होतं असतो. कारण तिच्या आवडीचा व्यवसाय, नोकरीं किंवा तिने निवडलेल्या करियर क्षेत्रात ती तीच 'बेस्ट' देत असते. विशेष म्हणजे तेव्हा ती कोणी माझी पत्नी, सून, मुलगी किंवा स्त्री नसते तर एक स्वतःचा अस्तित्व त्या क्षेत्रात सिद्ध केलं आहे अशी कर्तबगार व्यक्ती असते. ती तिथे असते कारण ती त्या साठी योग्य असते. 

  माझ्या साठी 'ती' आहे माझी मैत्रीण, सखी, माझ्या बाळाची आई. आणि खरं सांगतो खरं तर मी तिच्या साठी सौभाग्य आहे कि नाही तो संशोधणाचा विषय आहे, पण ती मात्र खात्रीने माझं सौभाग्य आहे. प्रिय 'ती' मी हे तुझ्या साठी येथे हे लिहलं आहे कारण जेव्हा कधी तुला वाटेल कि तू थकली आहेस, तू हरत आहेस, काही चांगल होतं नाही, तू एकटी आहेस तेव्हा तेव्हा हे वाच आणि खात्री बाळग कि मी तूझ्या सोबती आहे नेहमीच. त्यामुळे काळजी करू नकोस कधी काही गोष्टी आणि बाबी मिळवायल थोडं 'लेट' होईल पण आपण ते उशिरा का असो ना तरी देखील थेट मिळवणारचं आहोतच.

  माझ्या वाचक मित्र आणि मैत्रिणींनो आपण हा लेख कधी वाचन कराल तेव्हा लक्षात असुद्या आपण एकटे नाही आहात. मी आणि (माझ्या सारखे 'मी').. देखील आपल्या सोबत आहेत. माझ्या प्रिय मैत्रीण प्लस पत्नी साठी विशेष शुभेच्छा तू नेहमीच अशीच प्रगती कर. 

  माझ्या सगळ्या 'ती' (आई, मैत्रीण, बहीण, मावशी, अक्का, वहिनी, मावशी, आजी आणि माझ्या लेकीन साठी) मंडळी काळजी नका करू... आपली पाऊले अशीच पुढे टाकत रहा....


लेखन 

- प्रदिप नामदेव चोगले 

24 जुलै 2023, 08.17 संध्याकाळ

कल्याण-कुलाबा लोकल प्रवास 



संदर्भ चित्र : - 

https://www.shutterstock.com/image-vector/emotional-intelligence-control-feeling-emotion-psychology-2204993863 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५