Posts

Showing posts from December, 2023

मुरलेली वाईन _

Image
    मुरलेली वाईन  कधीतरी अचानक एखादी आठवण काट्या टोचल्या सारखी सळते  कळत नाही त्या क्षणी हे काय आणि कश्याच शल्य उरी दाटून आलं आहे   II१II बऱ्यावेळा ही आठवण नयनी अश्रू देते आणि ह्रदयचे ठोके वाढवते  पण कधी तरी या स्मरणीका ओठांवर अलगद हसू देऊन जातात  II२II शेवटी असू काय नी हसू काय दोन्ही माझ्या सख्या सोबती आहेत  भेद इतकाचं आहे पहिली बहुधा रोज भेट देते, दुसरी मात्र आजकाल अंतर राखते  II३II आता माझं वाढलेल वय माझ्या शरीरावर दिसत आहे जणु मला ते सांगत आहे कि मित्रा आता गाडी उरतनीला लवकर लागेल  II४II  माझे हे शब्द कोणाला कदाचित आवडणार नाही वाढत्या वयाबद्दल  पण खरं तर हेच आहे वाढणार वय चेहऱ्यावर आणि वृत्तीचं तारुण्य ह्रदययावर  II५II नवीन स्पर्श, बेभान भावना आजकाल उरी पिंगा कमी घालतात  कदाचित वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि मुरलेली नाती त्यांना अवरोध करतात  II६II माहित असतं मला ही, कि ही संधी पुन्हा येणार नाही कदाचित  पण काय करावं स्वाभिमान, प्रामाणिकपणा आणि निष्ठा गाफिल नाही होऊन देत  II७II जशी जुनी झालेली वाईन अधिक रुचकर आणि पाचक बनते अगदी तसेच अनुभवी ह्रदय आणि तजेलदार मन जीवनाची गोडी वाढवते  II९II कव