मुरलेली वाईन _





   मुरलेली वाईन 


कधीतरी अचानक एखादी आठवण काट्या टोचल्या सारखी सळते 

कळत नाही त्या क्षणी हे काय आणि कश्याच शल्य उरी दाटून आलं आहे   II१II


बऱ्यावेळा ही आठवण नयनी अश्रू देते आणि ह्रदयचे ठोके वाढवते 

पण कधी तरी या स्मरणीका ओठांवर अलगद हसू देऊन जातात  II२II


शेवटी असू काय नी हसू काय दोन्ही माझ्या सख्या सोबती आहेत 

भेद इतकाचं आहे पहिली बहुधा रोज भेट देते, दुसरी मात्र आजकाल अंतर राखते  II३II


आता माझं वाढलेल वय माझ्या शरीरावर दिसत आहे

जणु मला ते सांगत आहे कि मित्रा आता गाडी उरतनीला लवकर लागेल  II४II 


माझे हे शब्द कोणाला कदाचित आवडणार नाही वाढत्या वयाबद्दल 

पण खरं तर हेच आहे वाढणार वय चेहऱ्यावर आणि वृत्तीचं तारुण्य ह्रदययावर  II५II


नवीन स्पर्श, बेभान भावना आजकाल उरी पिंगा कमी घालतात 

कदाचित वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि मुरलेली नाती त्यांना अवरोध करतात  II६II


माहित असतं मला ही, कि ही संधी पुन्हा येणार नाही कदाचित 

पण काय करावं स्वाभिमान, प्रामाणिकपणा आणि निष्ठा गाफिल नाही होऊन देत  II७II


जशी जुनी झालेली वाईन अधिक रुचकर आणि पाचक बनते

अगदी तसेच अनुभवी ह्रदय आणि तजेलदार मन जीवनाची गोडी वाढवते  II९II



कवी  

- प्रदिप नामदेव चोगले 

१३ डिसेंबर २०२३

कल्याण-कुलाबा लोकल प्रवास 

Comments

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५