.jpg)
मनोगत मी नसलो जरी उद्या या अवनी, तरी चालेल ही दुनियादारी | कधी आठवण येईल तुमच्या मनी तर नजर करा अंबरी ||1|| आनंदाचा यात्री मी, सफर माझी सागर लहरी | थोडं कुतूहल थोडं समजून केली मी विज्ञान मुसाफिरी ||2|| सांभाळले शब्द सावरलं झुकता तोल चारित्र्य घडवण्यासाठी | पण नेमीच जगलो तो, ती, आणि त्याचा 'मी' जपण्यासाठी ||3|| लाडका मी निसर्गाचा, देव मासा माझा सखा सोबती | घेतो मी रजा आपली पुन्हा धरणी कृतार्थ करण्यासाठी ||4|| ~ प्रदिप नामदेव चोगले