कल्पक चित्रपट आणि संवर्धनाचे धडे

एरिएटी, कल्पकता आणि संवर्धन मला बाळपानापासून निसर्ग आवडतो कारण माझ्या बालपण आणि शैशव अश्याच निसर्ग रम्य ठिकाणी कुंडलिका नदीच्या किनारी, रेवदंडा-मुरुड च्या समुद्र किनारी आणि फणसाड अभयारण्य च्या कुशीत गेला. त्यामुळेच मला निसर्ग अधिक जवळचा आणि आपुलकीचा वाटतो. ज्यांना म्हणून असं अनुभव जीवनात असेल अश्या मंडळी हा चित्रपट पाहून अधिक आनंद होईल यात काहीच नवल नाही. जग फार वेगाने बदलत आहे त्यात 'हवामान बदल' हि संकल्पना आता फक्त पुस्तकी अभ्यासाचा भाग नाही राहिला आहे तर तो आज आपला साऱ्यांचा एक दैनंदिन अनुभव झाला आहे. अवेळी येणार पाऊस, कधी पिढ्यान पिढ्या अनुभवली नाही अशी थंडी आणि वाढत जाणारा असह्य उन्हाळा हे या वातावरण बदलाचे दृश्य परिणाम. त्याच बरोबर शेतात पिकांवर येणारी प्रचंड टोळधाड, मासेमारी करताना समुद्रात मोठ्या प्रमाणात जाळ्यात अडकणारे जेलीफिश हि देशील या हवामान बदलाची चिन्हे. मग अश्यातच आपल्याला ऐकू येते कानी कि काही पक्षी प्रजाती नष्ट झाल्या आहेत तर कधी माझ्या आई-वडिलांनी खाल्लेला भाताचं वाण आता नाही राहिल आहे. सोप्या शब्दात सांगा...