Posts

Showing posts from March, 2025

भारतीय समुद्री क्षेत्रात विचरण करणारे सागरी सस्तन प्राणी आणि आपण – भाग ४

Image
  इंडो-पॅसिफिक फिनलेस पोर्पोइस   २०२१ च्या एप्रिल महिन्यात मी त्यांना प्रत्यक्षात पहिल्यांदा पहिला. अचानक काही छोटी काळी आकृती पाण्यात गुपचूप गडप झाली असं  मला दिसलं. हातात कॅमेरा आणि गळ्यात माझी लाडकी दुर्बीण होतीच , मी लगेच पुन्हा तयारी करून सज्ज झालो आणि मला त्याला माझ्या कॅमेरात  काही वेळाने टिपता आलं. जेफरसन आणि इतर संशोधक सहकारी यांच्या 'मरीन मॅमल ऑफ द वर्ल्ड' पुस्तकात वाचलेलं वर्णन आणि चित्रे याना पुन्हा आठवलं आणि मी नक्की केलं कि होय मी फिनलेस पॉरपॉइज (पोर्पोइस)  पाहिला. वेंगुर्ला बंदरापासून साधारण ५०० मीटर अंतरावर मी हि नोंद केली. सागरी सस्तन प्राणी सर्वेक्षण मोहिमेत आम्ही टीम CMFRI ने केलेली त्या वर्षाची हि पहिली नोंद.    जगभरात फोसीनिडे कुळात ज्याचा समावेश होतो अश्या सात जातीचे पॉरपॉइज समुद्रात विचरण करतात. साधारण २. ५ मीटर पेक्षा यांची लांबी कमी असते. या सर्व जातीचे पॉरपॉइज बहुधा उथळ किनारी सागरी क्षेत्रात वावरत असतात याला अपवाद म्हणजे डॅल्स पोर्पोइस आणि डोळ्याभोवती चष्म्या सारखी दिसणारी काळी वर्तुळे असलेले स्पेकट्याक्लेटेड पॉरपॉइज. या दोन्...