Posts

Showing posts from November, 2025

आनंदाचे शोध यात्री _३

Image
   भारताचे ‘टर्टल मॅन ऑफ इंडिया’ : सतीश भास्कर - एका दुर्दम्य प्रवासाची गाथा    भारतातील सागरी कासवांच्या (Sea Turtles) संवर्धनाची खऱ्या अर्थाने सुरुवात ज्यांच्यामुळे झाली, त्या सतीश भास्कर यांचा जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांचा जन्म ११ सप्टेंबर १९४६ रोजी झाला आणि २२ मार्च २०२३ रोजी त्यांचे निधन झाले. सतीश भास्कर हे मूळचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मधील एक शांत पण उत्साही तरुण होते.   ७० च्या दशकाच्या सुरुवातीला, चेन्नईजवळील मद्रास स्नेक पार्क (Madras Snake Park) हे अनेक अशा विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र होते, ज्यांना पारंपरिक महाविद्यालयीन शिक्षणाचा कंटाळा आला होता. सतीश हे याच गटातील होते आणि त्यांची आवड होती की ते दररोज सकाळी अनेक किलोमीटर धावून एलियटच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहायला जात असत. त्यांना समुद्राची इतकी आवड होती की त्यांचे वसतिगृहातील मित्र त्यांना खासगीत 'अक्वामॅन' (Aquaman) म्हणत असत. संधी साधून, आयआयटीच्या अभ्यासक्रमातून मन विचलित झालेल्या सतीश यांनी क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. मद्रास स्नेक पार्कने त्यांना फील्ड ऑफ...

आनंदाचे शोध यात्री _२

Image
  आर्ची कार: एका समुद्री कासव संशोधकाचा जागतिक विचार प्रसार आर्ची कार हे अमेरिकन दिग्गज समुद्रकासवा-तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. पण त्यांच्या विचारांचा प्रभाव केवळ अमेरिकेपुरताच मर्यादित नव्हता. विज्ञान आणि साहस यांचे मिश्रण असणाऱ्या त्यांच्या सशक्त लेखनाने जगभरातील वाचक मंडळीना भुरळ पाडली आहे ज्यामुळे त्यांची  पुस्तके डझनभर भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. जी आज देखील बऱ्याच निसर्ग अभ्यासकाना प्रेरणा देतात.    एका अलीकडील संशोधन प्रकल्पात कार यांच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीची संपूर्ण कहाणी उलगडून समोर आली आहे, ज्यात त्यांच्या जगभरात प्रकाशित झालेल्या पुस्तकांची ही पहिलीच यादी तयार झाली आहे.   आर्ची कार यांना फार मोठी देणगी होती ती म्हणजे लेखनाची. ते फक्त तथ्ये सांगत नसत. समुद्र किनारी दुपारच्या वेळी जर आपण गरम वाळू वर चालू लागलो तर जशी ती उबदार वाळू आपल्याळ स्पर्श करते किंवा रात्री सागर किनारी गस्त घालणाऱ्या कासव मित्राला मादी कासवाची पाऊलवाट (फ्लिपरवाट) ज्या पद्धतीने आनंदाचं दान देते अगदी त्या प्रमाणे कार यांचे लेखन आहे. जे वाचताना आपल्याला आपण ते वाचत नसून प्रत्यक्ष...