Posts

Showing posts from December, 2025

कासव संवर्धन

Image
 महाराष्ट्रातील कासव संवर्धन कार्यातील लोकसहभाग आणि संशोधन वाटचालीचा मागोवा   कासव मित्र आणि कासवांचे गाव म्हणून आज ‘वेळास’ ची ओळख महाराष्ट्रातच नव्हे तर सपूर्ण विश्वात गाजत आहे. पण कशी झाली याची सुरवात याचा सिंहावलोकन करणे पण अतिशय रंजक आणि प्रेरणादायक आहे. या लेखाच्या माध्यमतून आपण समजून घेण्याचा प्रयत्ण करूया कासव संवर्धनची चळवळ आपल्या राज्यात कशी सुरू झाली त्या बद्दल.      महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले (olive ridleys) जातीच्या सागरी कासवांचे घरटे अधूनमधून आढळून येत असले तरी, या जीवांना मानवी आणि नैसर्गिक दोन्ही प्रकारच्या धोक्यांचा सामना करावा लागत होता. अंड्यांची आणि प्रौढ कासवांची चोरी (poaching), मासेमारीच्या जाळ्यांमध्ये (fishing nets) अडकून होणारा मृत्यू (incidental catch), आणि किनारपट्टीवर होणारी विकासकामे हे महाराष्ट्रातील सागरी कासवांसाठी प्रमुख धोके ठरले होते. विशेषतः, मानवाद्वारे होणारी चोरी आणि कोल्ह्यांकडून (Canis aureus) अंड्यांचे भक्षण केल्यामुळे (predation) कासवांच्या घरट्यांची संख्या सातत्याने कमी होत होती.  या गंभीर परि...