Posts

Showing posts from February, 2026

कासव संवर्धन _ भाग २

Image
 महाराष्ट्रातील समुद्री कासव संवर्धनाची मागील पाच वर्षांपर्यंतची रंजक सफर   समुद्री कासवे हे आपल्या महासागरांचे प्राचीन रक्षक आहेत. सागरी परिसंस्थेचे संतुलन राखण्यात ते  महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु,  आपल्या समुद्रातील हालचाली मुले त्यांचे अस्तित्व मोठ्या  प्रमाणात धोक्यात आले आहे. १९८१ ते २०२१ या कालावधीतील या बाबत काय घडले हे प्राची आणि इतर संशोधक मंडळी याने २०२३ मध्ये एका पुनरावलोकन शोधनिबंधा द्वारे प्रकाशित केले आहे. त्या आधारे येथे आपण समजून घेऊया या कालावधीत कासव संशोधन आणि संवर्धन या बाबत संक्षिप्त तपशील. या अभ्यासांनी अरबी समुद्रातील पाण्यात समुद्री कासवांच्या पाच प्रजाती आढळतात असे दिसून आले.  ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, हॉक्सबिल, लॉगरहेड आणि लेदरबॅक. यापैकी, ऑलिव्ह रिडले ही सर्वात जास्त दिसणारी प्रजाती आहे, जी कोंकण पट्ट्यात घरटी बनवण्यासाठी ओळखली जाते. संशोधनाने समुद्री कासवांच्या मृतदेह किनाऱ्यावर येण्याच्या (स्ट्रँडिंग) प्रसंगात लक्षणीय वाढ दाखवली आहे. २०१७ ते २०२१ या कालावधीत, महाराष्ट्रात अशा प्रसंगांची वारंवारता जास्त होती, २०१८ (६२ प्रसं...