ससून डॉक:- इतिहासाच्या पानांपासून आजच्या गजबजलेल्या बंदरापर्यंत

      मासेमारी व मासेविक्री यांना जोडणारा महत्वाचा दुवा अर्थात मासेमारीसाठी उपयुक्त ठरेल असं एखादं बंदर म्हणजेच ससून डॉक.कोणी मुंबईत आला आणि तो कुलाबा पाहावयास गेला तर तिथे त्याला मासे-मासळीचा उग्रदर्प, समुद्राची खारट हवा यांचा अनुभव मिळतोच, जिथे हे सर्व घडते ती जागा अर्थात 'ससून डॉक' माहित नाही असे होणारच नाही. 

       तरीही मित्रांनो आपण आज हे आपलं नातं आणखी घट्ट करणार आहोत या बंदरापासून जे आपलं असं हक्काचं आहे आणि सर्वांच्या आश्रयाचं असं ससून डॉक.
      सात बेटांपासून जी बनली ती आपली मुंबई नगरी.विविध सात बेटे व मग त्यांना जोडणाऱ्या  खाडया आणि समुद्र अशीच खूप खास ओळख १६व्या शतकापर्यंत मुंबईची जगभरात होती. कोळी आणि भंडारी हे येथील मुख्य रहिवासी असा इतिहास आहे आणि ही गोष्ट कित्येक पुस्तक आणि लेख यांच्यासह सबळ पुराव्या सोबत सिद्ध होते. साधारण १६१० पासुनच या मुंबईत एखादं मोठं ओलं बंदर असावं अशी वार्ता आणि गरज होती. परंतू ते स्वप्न सत्यात उतरलं १८७५ मध्ये ससून डॉकच्या रूपाने.
      परंतू हा प्रवास काही तितकासा सोपा नव्हता. मुंबईतले प्रख्यात एलफिन्सटन महाविद्यालयाच्या शेजारी आपणांस ‘डेविड ससून’ लायब्ररी आजही दिसेल. याच डेविड ससून आणि कंपनीचे मालक डेविड ससून यांचे पुत्र अल्बर्ट ससून यांनी हे बंदर आपल्या नावे विकत घेतले. सुरूवातीच्या काळात साधारण साडेतीन एकराच्या छोट्याशा जागेत जिथे पाण्याची खोली १० फुटांपर्यंत आहे व साधारण १,००० टन क्षमतेचे ५ जहाज राहू शकतील असा या बंदराचा इतिहास.
      या जागेसाठी भूसंपादन करण्याबाबत १८५४ मध्ये एक प्रस्तावना मांडण्यात आली. परंतू तत्कालीन शासनाकडे पुरेशा  निधी अभावी ही गोष्ट तशीच पडून राहीली. त्यानंतरच्या कालावधीत वेडिंगटन- डेलिस्ले योजना मांडण्यात आली. या योजनेलाच लागून पुढे वेडिंगटन-वेमेस योजना मांडण्यात आली जेणेकरून मुंबईसाठी एक मोठं आधुनिक ओलं बंदर मिळेल.  साधारण काही वेळानंतरच ही गोष्ट लंडन मध्ये रॉबर्ट स्टीफन यांच्या परीक्षणासाठी पाठवण्यात आली.वेळ हळूहळू सरत होती. साधारण १८५९ च्या सुमारास दोन कोटी पौंड पेक्षा अधिक रक्कम यांसाठी खर्च करण्यात येईल असा अंदाज बांधला गेला. या अवास्तव खर्चाचा अंदाज पाहून तत्कालीन कित्येक मोठया कंपन्यांनी या प्रकल्पासाठी विरोध दर्शवला.
      
          मजल दरमजल करत प्रस्तावित योजनेची जागा साधारण ४६ एकरांपर्यंत समुद्रात संपादन करण्याची योजना आखली गेली. यांसारख्या मोठया प्रकल्पांना येणाऱ्या अडचणी व दिरंगाई यामुळे तत्कालीन सरकारने इंग्लंडच्या धर्तीवर बंदर आणि नद्या यांचा ट्रस्ट करण्याचा विचार केला व त्यातुनच पुढे उभे राहिली पोर्ट ट्रस्ट. यथावकाश जी गोष्ट १८५४ ला कागदावर होती ती प्रत्यक्षात उतरवायला १८७५ च वर्ष उजाडलं.

      इतिहास का वाचायचा आणि शिकायचा असतो तर आपली गरीमा, वैभव, पुर्वजांचे कष्ट, भुतकाळीत चुका आणि भविष्यासाठी उपाययोजना आपण निर्माण करू असा भेदक आशावाद आपणांस मिळावा म्हणून. या अपार कष्टाने आणि जिकरीने उभ्या राहिलेल्या बंदराबद्दल तसेच ते वैभव टिकवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्टचे आपण ऋणी असलो पाहिजे.
         नवनिर्मितीची स्वप्ने ही भव्य आणि सुंदर अशी पाहावी. यांचाच जणु एक धडा आपणांस ससून डॉकच्या निर्मितीतुन मिळतो.
         एक सागरपुत्र आणि एक मुंबईकर म्हणून आपण हा ठेवा जपावा व त्याची काळजी घ्यावी हीच आपणांस नम्र विनंती.  


लेखन - प्रदिप नामदेव चोगले
संकल्पना - प्रदिप चोगले आणि दर्शन कोळी
टंकलेखन - विजय नामदेव चोगले
संपादन- शलाका प्रबोध हिंदळेकर

निर्मिती  - सागराणा creating sustainable oceans resources










मित्रांनो  अधिक माहितीसाठी खालील संदर्भ ग्रंथ वाचा. आपली प्रतिक्रिया आणि मतं दर्शवा. आवडल्यास नकीच शेयर करा 

  • टाईड ऑफ टाइम हिस्ट्री ऑफ मुंबई पोर्ट लेखक एम. वि . कामथ   

 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५