सागरकथा  ४ -  अंधार प्रकाशाचा खेळ अर्थात मासेमारी आणि LED लाईट  

  नमस्कार मित्रांनो, हि गोष्ट आहे दिनांक १ मार्च २०१८ ची दर वर्षाप्रमाणे होळी निमित्त मी गावी गेलो होतो. सर्वत्र आनंदाचा उत्साहाचं वातावरण होत. साधारण  ५-६ महिन्यांपासून एक गोष्ट सतत  ऐकू येत होती ती म्हणजे LED लाईटचा  होणारा मासेमारीसाठी वापर आणि त्यामुळे छोट्या मासेमारी बोटीची होणारी वाताहत. गाव मजगांव तालुका  मुरुड जिल्हा रायगड येथील हि घटना, साधारण ५०% पेक्षा अधिक लोक मासेमारीसाठी इतरांच्या बोटींवर खलाशी किंवा तांडेल म्हणून कामाला आहेत. जवळपासची  मुरुड, एकदरा, बोर्ली, कोर्लई, नांदगाव, रेवदंडा तसेच  अलिबाग, रेवस, नागाव या  येथे कामानिमित्त विखुरलेली. 
   मासेमारी संघटनांनी आणि  LED विरोधात मोर्चे  आणि आंदोलने  केली. काही गोष्टी पूर्ण करण्यात  आल्या तर काही गोष्टी आजही सरकारी कार्यलयात खितपत पडल्या आहेत. मासेमारी आणि मत्सविक्री या मध्ये असलेली जुगलबंदी काहीशी या गोष्टीनंतर पूर्ववत झाली. परंतु आता आपण समजून घेऊया काय आहे या मागचं विज्ञान आणि जागतिक आवाका. 
   जगभरातील विकसनशील देशात सुमारे १२-१३ दशलक्ष छोट्या प्रमाणात मासेमारी करणारे मासेमार आहेत जे रात्रीच्या अंधारात घासलेट/केरोसीन तेलावर जळणारे दिवे हे मासेमारीसाठी वापरतात, कि ज्यानें करून मासे या प्रकाशाकडे आकर्षले जातील (Evan mils et al., 2014). या  आश्या स्वरूपात इंधन जाळून मासेमारी करणे हि फार  पूर्वीपासूनची पद्धत विकसनशील देशात चालू होती ( Mills 2005 ) परंतु  या गोष्टीला एक  दुसरा  पर्याय  उपलब्ध झाला तो  म्हणजे १९९० पासून (Dutta & Mile 1994 ). हि संशोधन पत्रिकेतली माहिती वाचून आपणास यांची  जाणीव होईल  कि कृत्रिम प्रकाश वापरून मासेमारी करणे हि किती व्यापक आणि जुनी गोष्ट आहे. 
   प्रकाश आणि मासे यांच्यामधील संबंध
समुद्र विज्ञानाच्या भाषेत सांगायचा तर समुद्राला पाण्याची खोली आणि सूर्यप्रकाशाच्या उपलब्धता यांच्या संदर्भातून विविध विभागात(zone) मध्ये विभागलं जाते. समुद्र किनाऱ्यापासून जसे जसे आपण दूर आत समुद्रात जाऊ त्याला अनुसरून मुख्य दोन भाग पडतात. किनाऱ्यालगतच्या भाग (neritic zone) जेथे पाण्याची खोली आपण चालत जाऊ तेथून साधारण २०० मीटर खोलीपर्यंतचा भाग. त्याच्या पुढील भाग (oceanic zone) समुद्री भाग होय . neritic zone आणि oceanic zone मिळून जे बनते त्याला Pelagic zone असे म्हणतात. ग्रीक भाषेत Pelagic या शब्दाचा अर्थ होतो 'खोल समुद्र'. 
  जसे जसे आपण आणखी खोल समुद्रात जातो तसे तसे पाण्याची खोली व सूर्यप्रकाश यावरून त्याचे अनुक्रमे पुढील भाग होतात.    
         Epipelagic zone (0-200 m )
Mesopelagic zone ( 200-1000 m )
Bathypelagic zone ( 1000-4000 m )
Abyssopelagic zone ( 4000-6000 m)
Hadopelagic zone (6000 m - ते समुद्र तल )
मित्रांनो हि माहिती समजून घेण्याचा कारण  काय असेल तर विविध समुद्री जीव हे मुख्यतः उपलब्ध
अन्नपुरवठा आसपास किती आहे याला अनुसरून विशिष्ट आश्या अधिवासात राहतात. plankton वा प्लवक हे प्रमुख असं अन्नसाखळीचा भाग आहेत. जास्तीत जास्त आपण जी मासेमारी करतो ती pelagic fish पकडण्यासाठी करतो. 
  रावस आणि तारली असे मासे हे खुप मोठ्या संख्येने समुद्रात पोहत असतात. प्लवक हे प्रकाशाकडे आकर्षले जातात. म्हणूनच रात्री जेव्हा कृत्रिम प्रकाश समुद्रात पडतो तेव्हा असे प्लवक व त्याच्या मागे इतर मासे ओढवले जातात. हेच रहस्य आणि सूत्र आहे आजकालच्या LED लाईट आणि मोठ्या प्रमाणत केल्या जाणाऱ्या मासेमारी मागे.   
   खुप जास्त फायदा होतो म्हणून कित्येक लोकांनी लाखो रुपये खर्च करून या LED लाईट आणि जनित्र आपल्या बोटींवर बसवून घेतले. पण यात आपली फसवणूक झाली यांची जाणीव फारशी कोणाला झाली नाही. कृत्रिम प्रकाशाची तीव्रता आणि मिळणारे मासे याचा कधीच परस्पर सरळ संबंध नसतो.  Ben -Yami १९७६ यांच्या संशोधनाने हा सबंध एकमेकांस सरळ नसतो हे सिद्ध झाले. पण आपल्या येथे लोकांच्या अज्ञानीच पणा असा  ठरला कि जास्त LED लाईट म्हणजे अधिक मासे. याचं संशोधनातील मुद्दे समजून घेतले तर समजेल कि जास्त समुद्र पृष्ठ  भाग हा सौम्य LED वापरल्या तर जास्त शक्यता आहे अधिक मासे मिळण्याची. 
   हि माहिती आपल्या समोर मांडण्याचा कारण हे कि अधिका अधिक मासेमारी बांधवानी या मागचं विज्ञान समजून मासेमारी आणि समस्या चा उत्तर शोधावं. आपल्या अवतीभवती व आपणास या LED बद्दल काही अनुभव असेल तर मला सांगावा. 
  आवडल्यास LIKE आणि शेयर करायला हरकत नाही. आपल्या प्रतिक्रिया  कळवा. 
                                                        एक सागरपुत्र 
प्रदीप चोगले


लेखन - प्रदिप नामदेव चोगले
संकल्पना - प्रदिप चोगले आणि दर्शन कोळी
टंकलेखन - विजय नामदेव चोगले
संपादन- शलाका प्रबोध हिंदळेकर

निर्मिती  - सागराणा creating sustainable oceans resources







 IMAGE BY- http://www.comlitestore.com/media/wysiwyg/led-fishing-lights/all/led_fishing_lights_supplier_1.jpg




अधिक माहितीसाठी वाचा :- 

  • .ER291-3 Final reportApte, J., Gopal, A., Mathieu, J., Parthasarathy, S., & Gadgil, A. (2007). Improved lighting for Indian fishing communities. 
  • , 9-12.152, Marine Fisheries Information Service, Technical and Extension SeriesAchari, R. B., Joel, J. J., Gopakumar, G., Philipose, K. K., Thomas, K. T., & Velayudhan, A. K. (1998). Some observations on light fishing off Thiruvananthapuram Coast. 
  • , 30-41.21, Energy for Sustainable DevelopmentMills, E., Gengnagel, T., & Wollburg, P. (2014). Solar-LED alternatives to fuel-based lighting for night fishing. 
  • Mills, E. (2005). The specter of fuel-based lighting.
  • (2), 17-27.1, Energy for Sustainable DevelopmentDutt, G. S., & Mills, E. (1994). Illumination and sustainable development Part II: Implementing lighting efficiency programs. 
  • Ben-Yami M. Fishing with Light. FA0 fishing manual. Surrey, England: Fish News Books;
    1976









  
  



Comments

  1. Its very nice ..and thanks to u sharing dis information with us

    ReplyDelete
    Replies
    1. तु वाचून प्रतिक्रिया दिलीस, छान वाटलं

      Delete
  2. Mitra LED light mhanje khupach bahayank ahe. Fish sathi Ani koli bandhvasathi. Lekh khupch Sundar ahe. Tuzya lekhatun LED light and fish hunting yachi purn mhiti bhetli thanks a lot..

    ReplyDelete
    Replies
    1. thank you for your reply. लेख वाचुन प्रतिक्रिया दिली खूप छान वाटलं. अशी प्रतिक्रिया वाचून लेख लिहिण्याचं समाधान मिळतं. ☺️

      Delete
  3. छान माहिती ,अति आवश्यक ....!👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५