
समुदाय-आधारित संवर्धन (Community-based conservation ) आणि महाराष्ट्रातील कोळीवाडे- भाग १ दि ६ एप्रिल २०१९ आपण सर्वांनी खुप आनंदाने गुढीपाडवा सण साजरा केला. पण या नववर्षांच्या सुरुवातीपासून आपणं तमाम मासेमारी समाजाने कित्येक संकटाना तोंड द्याल सुरवात केली आहे. समुद्रात आधीच कमी होत जाणारी मत्स साठ्याची संख्या, त्याचं बरोबर गोराई, उत्तान, पालघर , वसई या भागात होत असलेली ONGC ची समुद्रात तेल साठ्याची शोधासाठी होत असलेली मोहीम आणि त्यामुळे आलेली मासेमारी वर आलेली बंधन, मोठ्या प्रमाणात होत असलेली विकास कामे जसे की समुद्री मार्ग (Coastal Road). कारण काही असो पण यात आज भरडला जातो तो साधारण कोळी समाज आणि आपली मासेमारी. यापूर्वी आपण कित्येक नेते आणि राजकीय पक्षांना आपली समस्या सांगितली परंतु आज पर्यंत कधीच कोणत्याच प्रश्नांना योग्य दाद नाही मिळाली. विकास कामांना विरोध करून कधीच आपण खात्रीलायक यश नाही मिळवू शकलो. परंतु जगभरात अशी कित्येक उदाहरण आहेत की जिकडे समुदाय-आधारित संवर्धन करून खुप मोठया प्रमाणात एखाद जंगल, पाणथळ जागा, माळरान वा समुद्री कि...