आठवणी आणि मी




कित्येकांणा खुप सोप असत
   आयुष्यात बरच काही विसरुण जाण
हरवलेला श्वास आणि बैचेनीचा ध्यास
   मंतरलेले ध्येय आणि मनाचे पाश

आठवणी या आशा असतात
   जणू सतत फडफडणारे झेंडे माळरानाचे
कोणी येवो न येवो पाहावयला
   मातीमध्ये रोवलेले आणि वाऱ्यापाशी जोडलेले

डोंगरावरच्या देवळामध्ये आता रोज होते गर्दी
  देवालाही माहीत आहे येथे कोणी नाही दर्दी
आगरबत्तीचा पुडा आणि उद धुपाची आरती
   मन हरवलेल्या माणसांची नित्याची ही खोगीरभारती

संपुन जावो हा जन्म तुटो हे श्वास
   आभास आता महानिद्रेचा विश्रांतीचा ध्यास
स्वप्ननाच्य दुनियेवरतीअंतिम सत्याची मात
   आठवणीच्या या सागराला आता देईल मी साथ

                                             - प्रदिप ना चोगले



टीप- २०१६ मध्ये मी हि कविते ची रचना केली.
        आपली प्रतिक्रिया नकीच कळवा.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५