समुदाय-आधारित  संवर्धन (Community-based conservation ) आणि महाराष्ट्रातील कोळीवाडे- भाग १


   दि ६ एप्रिल २०१९ आपण सर्वांनी खुप आनंदाने गुढीपाडवा सण साजरा केला. पण या नववर्षांच्या सुरुवातीपासून आपणं तमाम मासेमारी समाजाने कित्येक संकटाना तोंड द्याल सुरवात केली आहे. समुद्रात आधीच कमी होत जाणारी मत्स साठ्याची संख्या, त्याचं बरोबर गोराई, उत्तान, पालघर , वसई या भागात होत असलेली ONGC  ची समुद्रात तेल साठ्याची शोधासाठी होत असलेली मोहीम आणि त्यामुळे आलेली मासेमारी वर आलेली बंधन, मोठ्या प्रमाणात होत असलेली विकास कामे जसे की समुद्री मार्ग (Coastal Road). कारण काही असो पण यात आज भरडला जातो तो साधारण कोळी समाज आणि आपली मासेमारी. यापूर्वी आपण कित्येक नेते आणि राजकीय पक्षांना आपली समस्या सांगितली परंतु आज पर्यंत कधीच कोणत्याच प्रश्नांना योग्य दाद नाही मिळाली.
  विकास कामांना विरोध करून कधीच आपण खात्रीलायक यश नाही मिळवू शकलो. परंतु जगभरात अशी कित्येक उदाहरण आहेत की जिकडे समुदाय-आधारित  संवर्धन करून खुप मोठया प्रमाणात एखाद जंगल, पाणथळ जागा, माळरान वा समुद्री किनारी सापडणारा जीव सृष्टी. आणि या प्रयत्नातुन स्थानिक लोकांना उपजीविकेसाठी आणखी पर्यायी मार्ग वा आधीच उपलब्ध गोष्टीला आणखी छान स्वरूप देता आले.
  भारतात समुदाय-आधारित  संवर्धन ची उत्तम उदाहरण अर्थात देवराई, जेथे एकादी जागा आणि माळरान स्थानिक लोक समूह ते रान देवचं रान  म्हणून रक्षित केलं जात आणि तेथील लोकांना ती जागा योग्य पद्धतीने वापरता येते.
  आज कित्येक विकास कामे हि समुद्र किनारा आणि कोळीवाडे याच्या आसपास होत आहेत. परंतु विशिष्ट सागरी किनाऱ्याच्या शास्त्रशुद्ध अभ्यास, तेथील सागरी जीवसृष्टी आणि इतर पर्यावरणीय घटकांचं अभ्यास, स्थानिक कोळीवाडे आणि त्याची उपजीविकेचे साधने, मासेमारी आणि त्याच्या पद्धती, खाडी आणि समुद्र याच्या संबंधी असलेले कायदे आणि त्या मागचं विज्ञान या बद्दल असलेली माहितीची या गोष्टी आज आपणास माहित असणे खुप गरजेचं आहे. आज कित्येक विकास कामे आपल्या पोटावर घाव घालत आहेत परंतु आपणांस हे जर थांबवायचं असेल तर गरज आहे आपण करत असलेली मासेमारी हि आधुनिक विज्ञान आणि संशोधन याच्या पायावर उभी केली पाहिजे. आपण करत असलेले मासेमारी तेथील सागरी अधिवास आणि समुद्री जीव यांची योग्य पद्धतीने नोंद झाली पाहिजे. आपलं पारंपरिक कोशल्य आणि जागा जगभरात योग्य अश्या संशोधन पत्रिकेत नोंद केल्या पाहिजे. आपली पारंपरिक मासेमारी च्या भूमिके बरोबर समुद्र संवर्धनाची झालर आपण स्वीकारली पाहिजे.
  एक समुद्र विज्ञान शाखेचा विद्यार्थी आणि संशोधक त्याच बरोबर या कोळी समाजाचं एक सागरपुत्र म्हणून मला जे वाटले ते मी आपणांस सांगितलं आहे. या लेखाच्या पुढील भागात मी आपणस समुदाय-आधारित  संवर्धन ची जगातील काही खास उदाहरणे स्पष्ट करेल.
                                                                             - प्रदिप नामदेव चोगले
                         


टीप- आपणांस हा लेख कसा वाटला ते नकी कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे विचार आपण पोहचू म्हणजे समुद्र संवर्धनाची भूमिका आपण यशस्वी पद्धतीने पोहचू. वाढत्या विकास कामात आपण आपले कोळीवाडे आणि मासेमारी जतन करू.
 

Comments

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५