
'लाईफ ऑन अर्थ' एक पुस्तक परिचय - भाग १ खूप दिवसांनी पुन्हा मी प्रदिप नामदेव चोगले घेऊन आलो आहे हा एक आणखी छान लेख तुमच्यासाठी ज्यात आपण समजून घेणार आहोत एका मस्त पुस्तकाला. लाईफ ऑन अर्थ हे मूळ इंग्रजी पुस्तक आहे ज्याचं लेखन केल आहे सर डेव्हिड आटेबरो यांनी ज्याला प्रकाशित केला आहे बुक क्लब असोसिएट लंडन यांनी. नुकतंच आपण या या नावाची २ री मालिका डिस्कव्हरी आणि नॅशनल जिओग्राफी वर पहिली असेल. हे पुस्तक म्हणजे या मालिकेची १ भाग आहे. सदर पुस्तकात सुरवातीला लेखक महोदयांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे त्या नंतर एकूण १३ प्रकरण आहेत. या सदर लेखात आपण याची तोंड ओळख करून घेणार आहोत. लेखक जेव्हा दक्षिण आफ्रिका च्या विमानतळावर उतरतो तेव्हा तेथील वृतीय सजीव सृष्टी पाहून स्तंभित होतात. शालेय अभ्यासक्रमात आपण कर्कवृत आणि मकरवृत याचं बद्दल वाचलं असलं. वृतीय भागात असलेलं हवेतला दमट पणा आणि घाम यांनी ते न्हाऊन जातात परंतु, जेव्हा नानाविधी वनस्पती आणि प्राणी पक्षी पाहून ते सुखावतात. या पुस्तकातील पहिलं प्रकरण आहे अनंत जैवविविधता बद्दल ज्याची सुरवात होते महान जीवव...