सागर कथा~ मैफिल समाज रचनेची आणि मासेमारी




  दि ३१/१०/२०१९ पासून माझा प्रवास सुरु झाला. रात्री ०९ वाजता मुबंई-चिपळूण गाडीने याची सुरुवात झाली. उलघडायचं होत सुंदर कोकण आणि तेथील लोक जीवन. सुंदर स्वच्छ समुद्री किनारे, भरभरून पसरलेला निसर्ग यांच्या सोबत होणारी मासेमारी आणि इतर सागरी दुवे यांचा अभ्यास करण्यासाठी मी हि मुसाफिरी करत होतो. यातील एक पैलु म्हणजे इकडचं समाज जीवन जवळून अनुभवणे.
  १० दिवसा पूर्वीचं महाराष्ट्रात आमदारकीच्या निवडणुका पार पडल्या होत्या सर्वत्र जात आणि धर्म या आधारावर माणूस रंगा मध्ये विभागला होता. कुठे भगवा रंग अधिक भरून होता तरी कुठे निळा रंग विखुरला होता मध्येच एखादी हिरवी छटा दिसून येत होती. थोडं वाईट वाटलं की अजून हि या एवढ्या मोठ्या लोकशाही देशात जात आणि धर्म यांमध्ये होता. असो निवडणुका आल्या आणि गेल्या परंतु जी गोष्ट मुबंई नगरीत मनाला त्रास  देत होती इथे कोकणात मात्र या बद्दल परिस्थिती वेगळी होती. प्रवासाच्या सुरवातीपासून अगदी चिपळूण ला उतरेपर्यंत या भेदाभेदाच्या सीमा विरघळून जात होत्या. मुबंई-गोवा महामार्ग म्हणजे प्रचंड खडे आणि धूळ यांनी भरलेला रस्ता. हो पण सकाळी ६.०६ ला चिपळूण ला परशुराम मंदिरला नमन करून कोकण उलगडायला सुरवात झाली. माझी वाट पाहत होती ती जी माझ्यावर खुप प्रेम करते ××++×× आणि  जिच्यावर मी माझं जीव ओतायला तयार  होतो ती ××++××. यातील दोन्ही गोष्टीत 'ती' आहे बरं का. आता ती कोण हे तुम्हला हा लेख वाचून शोधायचं आहे.
  चिपळूण शहर आहे तसं छोटं पण त्याचा विस्तार मात्र बराच अवास्तव पसरलेला. छान  मिसळ खाऊन प्रवासात गेलेली ताकत परत मिळवली आणि मी पूढे मार्गस्त झालो. सुंदर हिरवा निसर्ग आणि छोट्या मोठया जलप्रवाह या डोंगर पठरावर वाहत होते. काही गोष्टी ज्या या प्रवासात अनुभवल्या त्या कदाचित शब्दात व्यक्त नाही करता येणार. भाषा मराठी होती परंतु धर्म मात्र वेशभूषा आणि व्यवसाय यांतून दिसून येत होता. एक लहान गोड मुलगी जी डोकं आणि कान झाकून मशिदीत प्रार्थनेला जात होती तिच्या त्या डोळ्यांची चमक काहीतरी अंतरीची खून सांगून गेली. पूढे आणखी आलो एक गावकरी माझा वाटाड्या झाला आणि आपली कथा सांगत त्याच्या समाज जीवनच वर्णन करत होता. गावातल्या मातीत काही तरी अद्भुत असं असावा म्हणूनच कि काय ती माणसं या मातीसारखी निर्मळ आणि आपुलकीचा पाणी लागलं की सुगधं वाटू लागतात. पुढे एक मोठी नदी आली नदी पात्रात ऊन खात पसरलेल्या मगरी असं सांगत त्या गावगड्याने मला ती जागा दाखवली. योजलेल्या जागी मुकामाला पोचलो थोडं जेवण करून छान पहुडलो. संध्याकाळी ४ च्या सुमारास जवळील रस्ता धरून फिरू लागलो. सोबत ती होती ××++× जिच्यामुळे मी सरडे, पक्षी आणि दूर पसरलेला निसर्ग आनंदाने पाहू शकलो. आपण जेव्हा आपलीच सोबत करतो तेव्हा स्वतः मधील स्वतः अधिक मोकळं होत. शांत मोकळी मंदिर आणि रस्ते, दूर पोहचणार वाट, निरव माळरान सर्वच कसं अगदी प्रसन्न आणि आनंद देणार. खूप गप्पा झाल्या मातीतील खपणाऱ्या आणि कष्टात रुजणाऱ्या लोकांसोबत. रात्र किर्र अंधारात गेली परंतु माणूस पणापासून देवत्वाकडे मन झुकल.
  सकाळ झाली गोड आठवणी आणि झणझणीत भुर्जी घेऊन चिपळूण नगरीला निरोप दिला. कोणी तरी एका दिवसात आपलंसं करून गेलं अशी ओढ मनात राहिली आणि पुढे निघालो पुन्हा परतण्यासाठी.
                  ( गोष्ट १ ली- क्रमश )
                 लेखन:-  प्रदिप नामदेव चोगले



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५