संवर्धणाची भाषा



शाळेत शिकत होत मी
  , आ आणि आई
वेळ बदलला काळ लोटला
  लागली सर्वांना विकासाची घाई IIII


लहान होतो तेव्हा चंद्र होता मामा
  आणि चिव चिव करणारी चिउताई
आता मोठा झालो मी फार
  तेव्हा समजले चंद्र तर अप्रकाशित दगडी भार IIII


जोतिबा आणि सावित्री ने ज्ञान गंगोत्रि दावली
  शिक्षणाची दारे सारी गावोगावी उघडली
आता आले आहेत थ्रिजी आणि फोरजी
  मुल आणि पाल्य सर्व त्याच्यातचं बिजी IIII


भाषा असते अभिव्यक्तीसाठी हे तर सर्वजण विसरलेत
  माझ्या भारत भूमीत सर्व चौकटी डांबलेत
ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेंट चेंज ची सर्वत्र चर्चा सत्रे
  गावचा खेडूत आजही येथे देवराई च्या विचार गात्रेत IIII


आमची म्हातारी आज ही शेतात देशी बियाणे जपते
  नको संकर पर बियांचं म्हणून मातीत ती खपते
नाही भाषा त्यांना अवगत इंग्लंडच्या त्या महाराणीची
  परंतु कळते नागपंचमी आणि पोळा ही व्रते चिरंतन निसर्गाची IIII


अहो साहेब इंग्रजी बीइंग्रजी ठीक आहे जागतिकी करणासाठी 
  मर्म मनाचे, भाव सृजनचे ही तर मातृभाषेतील अभिव्यक्ती
विचार करूया आपण सारे संवर्धनचि वाट जपताना
  कशास यावी भाषेची अडसर जर हृदय सुरांनी छेडताना IIII


 कवी - प्रदिप नामदेव चोगले
मोबाईल – ९०२९१४५१७७
ई-मेल – pradipnc93@gmail.com
कुलाबा मुंबई ०५


कवितेचा भावार्थ :- आज सर्वत्र आधुनिक शिक्षणा मुळे संवर्धणा ची चळवळ जोर धरत आहे, परंतु या इंग्रजी पाश्चिमात्य भाषेमध्ये (विचारा) सर्वच गोष्टी आज अडकल्या गेल्या आहेत. गावातील खेडूत माणसाला जरी ही भाषा अवगत नसली तरी संवर्धणा ची गोम काय हे त्याला समजते. भाषेची अडसर न ठेवता स्थानिक भाषेत जर विचार मांडले तर संवर्धण जोर धरू लागेल ही बाब या कवितेतून कवि ने मांडली आहे.
POEM // Theme :- Languages // language of conservation







Comments

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५