जागतिक वसुंधरा दिवस   

  आज  २२ एप्रिल म्हणजे जागतिक वसुंधरा दिवस या दिवसाचं  औचित्य साधून मी तुमचा मित्र घेऊन आलो आहे हि एक कविता. या धरणीला सुजलाम आणि सुफलाम करण्याचा महत्वाचं कार्य जर कोणता घटक करत असेल तो म्हणजे पाणी. या भूतलावरील खुप मोठा भाग हा पाण्याने व्याप्त आहे तो म्हणे ७८% एवढा. यात  सर्वात मोठा वाटा  आहे आपल्या महासागरी पाण्याचा  कारण पृथ्वीवर तुलनात्मक रित्या गोड्या वा पिण्याच्या पाण्याचे खूप मर्यादित साठे आहेत. 
  महासागरीय प्लस्टिक प्रदूषण एक मोठी समस्या आहे. या प्रदूषणामुळे जर सर्वात मोठया प्रमाणात कोणता समाज घटक तोटा  सहन करत असेल तर तो म्हणजे या दर्या राज्यावर जगणारा सागरपुत्र म्हणजे हा मासेमारी समाज. 
   एक समुद्र  विज्ञान शाखेचा विद्यार्थी म्हणून पण त्याच बरोबर एक मच्छिमार समाजाचा मुलगा म्हणून हि प्लँस्टीक  प्रदूषण समस्या किती  भयंकर आहे हे मी नेहमी विविध संशोधन पत्रिका आणि मासेमारी करताना पाहतो आहे. या दर्या  सागराला हा कोळी माणूस कृतज्ञता म्हणून नेहमी मानाने नारळ अर्पण करत असतोच परंतु मासेमारी करताना चुकून जाळ्यात सापडणारे समुद्री कासवे आणि मोठे अजस्त्र व्हेल व शार्क देखील देव समजून त्यांना वाचवण्यासाठी आपली जाळी कापून त्याना  समुद्रात सुरक्षित सोडतो. 
  साता बेटाची हि मुबंई नगरी आणि येथील मूळ भूमिपुत्र म्हणजे हा आपला मासेमारी समाज. काळासोबत बराच बदल   झाला आणि मासेमारी आता यांत्रिक झाली. या मध्ये एक गोष्ट झाली म्हणजे दर्याची मासळी कमी झाली. सदर कवितेतून या समाज जीवनाची कथा सागर ऋचा म्हणून मी आपणासमोर आणली आहे. 
  शेवटी या कवितेतून आणि या २२ एप्रिल रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक वसुंधरा दिवसाचं औचित्य साधून एवढंच सांगेल कि आपण प्लँस्टीक  प्रदुषणाला कमी करण्याच स्वतःहून प्रयत्न केला पाहिजे. त्याच्या बरोबर निसर्ग पूरक आपल्या पारंपरिक चिरंतन मासेमारीला स्वीकारलं पाहिजे. 

                                                        एक सागरपुत्र 
प्रदीप नामदेव चोगले 













टीप :- आपणांस हि कविता आणि हा लेख आवडल्यास आपली प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये नोंदवावी. हा लेख आपल्या मित्राना शेर करू शकता. वेळ देऊन तुम्ही हा लेख आणि हि कविता वाचली या बद्दल धन्यवाद. 









Comments

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५