बुद्ध पौर्णिमा आणि मी 


  आजचा दिवस खूप खास आहे माझ्यासाठी कारण हाच तो दिवस आहे ज्या दिवशी माझ्या जीवनाला कलाटणी घडणाऱ्या घटना भगवान बुद्ध यांच्या प्रेरणेने घडल्या. या जगात कुठल्याच महापुरुषाच्या जीवनात इतका अद्भुत योगायोग नाही घडला असेल. याची विशेषता म्हणजे याच दिवशी भगवान बुद्ध याचा जन्म झाला याच दिवशी त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि याच दिवशी त्यांनी महापरिनिर्वाण स्वीकारलं. खरंतर माझी इतकी योग्यता नाही कि मी या प्रचंड चुंबकीय व्यक्तिमत्वाबद्दल काही लिहलं वा बोललं पाहिजे परंतु कृतज्ञता बुद्धीने मी हे करत आहे. आज माझ्या जीवनाला जो आकार प्राप्त झाला आहे त्याला मोठ्या प्रमाणात बुद्ध चरित्राचं वाचन कारणीभूत आहे. योग्य पुस्तक योग्य वेळी जर आपल्या हाती पडलं तर जीवनाची दिशा बदलू शकते याचा प्रत्यय मी स्वतः घेतला आहे. 
  हि गोष्ट आहे साल १९९८ ची जेव्हा मी इयत्ता ३ री मध्ये शिकत होतो. माझ्या शाळेचं नाव कुलाबा महानगर पालिका मराठी शाळा क्रमांक ३. निमित्त होत बुद्ध पौर्णिमे च्या निमित्ताने शाळेत वक्तृत्व स्पर्धा आणि मी त्यात भाग घेतला होता विषय होता 'माझी शाळा'. स्पर्धा संपली आणि माझा त्यात पहिला क्रमांक आला आमच्या वर्ग शिक्षिका आदरणीय हजारे बाई नि यावेळी एक पुस्तक मला भेट केलं नाव होत लीला जॉर्ज लिखित ' गौतम बुद्ध ' या पुस्तकात असलेली भगवान बुद्ध यांच्या जीवनपटावरील आधारित प्राचीन चित्रे आणि सोप्या शब्दात असलेली भाषा यामुळे हे पुस्तक आणि बुद्ध माझ्या मनात कायमचं घर करून गेली. हे पुस्तक इतकं अद्भुत होत कि साधारण २००५ पर्यंत मी १० च्या परीक्षेला पोहचेपर्यन्त त्याचा मी सातत्याने वाचन केलं. 
  हेच ते पहिलं पुस्तक आहे ज्यांनी मला वाचनाची आवड लावली आणि जीवनाकडे पहाण्याची तटस्थ भूमिका शिकवली. २००६ मध्ये जेव्हा मी विज्ञान शाखेत १२ बोर्डाची परीक्षा नापास झालो, आणि पुन्हा न निराश होता अभ्यासाची सुरवात केली. या काळात माझा सर्वात जास्त वेळ दोन गोष्टीत व्यतीत झाला एक म्हणजे समुद्र किनारी मासेमारी करणं आणि भटकणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रँथालयात पुस्तक वाचन करणे. या काळात आणखी काही पुस्तकांच्या माध्यमातून मला बद्ध मिळाले. हि पुस्तके अनुक्रमे खलीलप्रमाणे 
१:- बुद्ध हसतो आहे / लेखन :- मंगला आठलेकर 
२:- भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म / लेखन :- डॉ . भि. रा . आंबेडकर 
३:- सिद्धार्थ जातक कथा / लेखन :- दुर्गा भागवत 
  जातक कथेतील बुद्ध म्हणजे सातत्यपूर्वक माणूस म्हणून जगताना अनुभवलेली प्रगतिशील विकास गाथा. विज्ञान शाखेचा विद्यार्थी असून हि या कथा वाचनाने माझी बुद्धी आणि मन याचा सोबत विकास झाला. कथेतील प्रत्येक पात्र आणि घटना वाचन करणे म्हणे अद्भुत अनुभव. एक स्त्री च्या नजरेतून म्हणून बुद्ध कसे  जगले याची गोष्ट म्हणजे बुद्ध हसतो आहे हे पुस्तक. स्त्री कडे पाहण्याचा निराळा दृष्टिकोन यातून प्रकट होतो. घर दार सोडून बाहेर पडलेला सिद्धार्थ आणि बोधी प्राप्त झालेला बुद्ध हा प्रवास वाचन करणे आणि ते हि या पुस्तकाचा रूपाने म्हणजे खूप आनंददायक प्रवास. 
  या जगात बरेच महापुरुष आले आणि गेले परंतु इतक्या आकर्षक पद्धतीने मानवी समाजाला मौन, शांती आणि ज्ञान यांचा अदभूत मार्गाने दिशा देणारे बुद्ध मला अतिशय प्रिय आहेत. डॉ . बाबासाहेब आंबडेकरांनी या देशाला जी वैचारिक गती दिली ती कधीच कोणी दुर्लक्षित नाही करू शकत नाही परंतु या महामानवाला दिशा देण्याची प्रेरणा ज्यांनी दिली ते भगवान बुद्ध. बाबासाहेबाच्या लेखणीतून साकारीत झालेलं हे पुस्तक वाचताना जणू ते आपल्याशी बोलतात हेच मला जाणवलं. 
  बुद्ध पौर्णिमा हाच तो दिवस आहे ज्या निमित्ताने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबटे आणि इतर जंगली श्वापदे मोजणी च्या वार्षिक मोहिमेत मला सहभाग करता आला. बुद्ध पौर्णिमा हा तोच दिवस आहे ज्या दिवशी भरतीची मोठी लाट मी कोकणात अनुभवली आणि त्या नंतर येणाऱ्या मोठा ओहटीचं खाली सागरी विविधता अनुभवली. 
  बुद्ध नेहमी जीवनात सुंदरता आणि शांती घेऊन आले माझ्या जीवनात व या पुढे पण येतील. सर्वात सुंदर डोळे आणि सर्वात प्रभावशाली चेहरा माझ्यासाठी जर कोणचा असेल तर मी मनात साठवलेल्या भगवान बुद्ध यांचा आहे. 
  शब्द अपुरे आहेत लिहिण्यासाठी आणि बुद्धी नम्र आहे बुद्ध समजून घेणासाठी. माझे हे लेखन आणि अनुभव जर तुम्हाला बुद्ध चरित्र वाचन करण्यास प्रेरित करत असेल तर फार छान वाटेल मला. 
  हा लेख कसा वाटला  हे खाली कमेंट मध्ये लिहून नोंदवा. 



अधिक माहितीसाठी वाचा :- 

१- https://www.bookganga.com/R/58YEK
     बुद्ध हसतो आहे/ मंगला आठलेकर 
 २- 

Bhagwan Buddha Aani Tyancha Dhamm (भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म) (Marathi) Hardcover – 1 January 2003








    
  





































Comments

  1. Replies
    1. तुझी प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. धन्यवाद

      Delete
  2. Replies
    1. तुला लिखाण आवडलं हे पाहून आनंद झाला

      Delete
  3. Replies
    1. आपली प्रतिक्रिया पाहून आनंद झाला सर.

      Delete
  4. खूप छान.....सिद्धार्थ जातक हे पुस्तक गोष्टी स्वरूप आहे का

    ReplyDelete
    Replies
    1. हो भाऊ, फार सुंदर पुस्तक आहे. दुर्गा भागवत यांचं मराठी भाषेत सुंदर आणि सोप्या शब्दात लेखन आहे.

      Delete
  5. Always proud of you... You are really amazing human being pradip... Tujhe vichar aani likhan khup sundar aani shuddha aahe agdi tujhya manapramane. 😊

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५