
सागरी मत्स्य संपत्तिची वामन कथा - भाग १ भारतीय संस्कृतीत प्रसिद्ध असलेली दशावतार संकल्पना आणि कथा माहीत नसेल असे व्यक्तिमत्व कोणी अभावानेच असेल. या दशावतारात एक अवतार फार लोभस आहे पण जेव्हा ते आपली परिसीमा गाठते तेव्हा त्याची व्याप्ती मात्र अमर्याद होत जाते. वामन अवतार म्हणजे वरकरणी पाहता एक छोटं बालक रूप पण जेव्हा हाच वामन रूप धारी भगवंत बळी राजाकडे तीन पाऊले जमीन मागतो तेव्हा सुरवातीला नाजूक आणि इवलेसे भासणारी पाऊले तिन्ही लोक व्यापतात. पाचवे अवतार बळीच्या द्वाराला जासी भिक्षे स्थळ मागुनी बळीला पाताळी नेसी आरती गाताना आपण हे पद नेहमी गातो परंतु या अवताराची तशी सर्वसामान्य जनमानसात प्रसिद्धी नाही. असो या लेखाच्या माध्यमांतून मत्सव्यवस्थापन आणि नियोजन शाखेतील एक व्यापक शास्त्रीय गोष्ट आपणांस समजावून सांगताना या वामन रुपाची कृतज्ञता पूर्वक आठवण करणे इथे खूप उपयुक्त आहे. ज्याप्रमाणे सुरवातीला खूप लहान भासणारी तीन वामन पाऊले...